Download App

Arvind Kejriwal : डोक्यावर बंदूक ठेवून विचारले, ‘तुरुंगात जायचे की भाजपमध्ये?’

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्षांतील नेत्यांवर ईडी-सीबीआयने (CBI) छापा टाकले आहेत. यामध्ये अनेक नेत्यांना जेलमध्ये जावे लागले आहे. दिल्लीतील आपच्या चार मोठ्या नेत्यांवर ईडीने (ED) कारवाई केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा देखील समावेश आहे. यावरुनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या दिवशी भाजपचे सरकार सत्तेतून जाईल त्यावेळी त्यांचे अनेक नेते तुरुंगात असतील, असे म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत भाषण केले. यावेळी भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, 2025 सोडा, 2050 च्या निवडणुकाही भाजप जिंकू शकणार नाहीत. ईडी आणि सीबीआयने देशातील सर्व भ्रष्ट लोकांना एका पक्षात आणले आहे. ईडी-सीबीआयने छापा टाकला आणि त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून विचारले की तुम्हाला तुरुंगात जायचे आहे की भाजपमध्ये? ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, त्यांचे सरकार सत्तेतून जाईल, त्यावेळी भाजपच्या लोकांना तुरुंगात टाकले जाईल, देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केला आहे.

…म्हणून राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा; वंचित आघाडीची मागणी

केजरीवाल पुढं म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील लोकशाही चिरडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. भाजपच्या आठ आमदारांना अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. लोकांना प्रश्न पडला की अविश्वास दाखल करण्यासाठी 14 आमदारांची गरज असताना फक्त आठ आमदार कसे दाखल करु शकतात? तेव्हा भाजपने सहा आमदारांची व्यवस्था केल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत मी माझ्या सर्व आमदारांशी बोललो, त्यावेळी त्या सर्वांनी धमक्या येत असल्याचे सांगितले.

UPI पेमेंटवर चार्ज लागणार की नाही? NPCI ने दिले स्पष्टीकरण

सीएम केजरीवाल पुढे म्हणाले, “आमच्याकडे 62 आमदार आहेत. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याशिवाय राजेश गुप्ता, प्रकाश जारवाल आणि रोहित मेहरौलिया बाहेर आहेत. एक स्पीकर आहे. याशिवाय सर्व 56 आमदार येथे उपस्थित आहेत. त्यांना काल वाटले की आता काहीही होऊ शकले नाही तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेतला. मग आम्ही आमच्या स्वेच्छेने विश्वासदर्शक ठराव आणला आहे. त्यांनी आमच्या उणिवा दूर कराव्यात अशी आमची इच्छा आहे.”

Tags

follow us