…म्हणून राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा; वंचित आघाडीची मागणी

  • Written By: Published:
…म्हणून राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा; वंचित आघाडीची मागणी

काही दिवसापूर्वी पार पडलेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून वंचित बहुजन मुस्लिम आघाडीने विरोधी भूमिका घेतली आहे. याच प्रकरणात राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने केली.

Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर बोलू नका’, शरद पवारांचे थेट आदेश

गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून माहीम समुद्रात ६५० वर्षांपासून असलेल्या एका जागेवर आक्षेप घेत गेल्या दोन वर्षांपासून दर्ग्याचे काम सुरु आहे, अशी खोटी माहिती पसरवली. शिवाय ३० दिवसात तो दर्गा पाडला नाही तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभारू असे, वादग्रस्त विधान करून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप त्यांनी तक्रार करताना केला आहे.

आपलय तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे की राज ठाकरे यांनी सदर ऐतिहासिक बैठकीच्या गुरुस्थानाबाबत अनधिकृत बांधकाम असा केलेला उल्लेख पूर्णतः चुकीचा असून दोन समाजात दंगे पसरविण्याच्या उद्देशाने केलेला आहे. सदर पवित्र जागा वक्फ बोर्ड यांच्या नावे औरंगाबाद येथे नोंद केलेली आहे. सदर स्थळाचा अभ्यास न करता जाणीवपूर्वक केलेले हे विधान आहे. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असून दंगा पसरवण्याच्या उद्देशाने केलेले विधान असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. अशी मागणी करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तक्रार करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Politics : अंधारेताई मर्यादा पाळा, तुमचा अधिकार काय ? ; निलेश राणेंनी सुनावलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube