Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर बोलू नका’, शरद पवारांचे थेट आदेश

Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर बोलू नका’, शरद पवारांचे थेट आदेश

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना धमकी आणि १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी याना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस (Police) करत आहेत. पोलीस चौकशीत अनिक्षा जयसिंघानी मोठा दावा केल्याचा सांगितलं जात आहे. अनिल जयसिंघानी हे पवारांच्या संपर्कात होते, असा दावा करण्यात आला.

या प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) कोणत्याही नेत्यांनी बोलू नये, अशा प्रकारची सक्त ताकीद शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व नेत्यांना दिली आहे. या आरोपावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) म्हणाले होते की, पोलीस जाणून बुजून करत आहेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे राज्यातील जनतेला आणि सर्वांना ते शक्य आहे. कोणाचाही फोन आला तरी ते उचलत असतात. कारण नसताना या प्रकरणामध्ये राजकीय रंग दिले जात आहेत.

राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

आम्ही या प्रकरणात आजून देखील काही बोलत नाही. ८३ वर्षाचे शरद पवार आहेत. मला स्वत: या प्रकरणात पक्षाच्या कोणत्याही नेत्याला बोलायला देऊ नको, अशी सक्त ताकीद शरद पवार यांनी केली. अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीने मोठा दावा केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना पाठवण्यात आलेल्या एका मेसेजमध्ये सांगितल जात आहे की, तिचे वडील अनिल जयसिंघानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेहमी संपर्कात राहत असत आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी कोर्टाला दिली.

या संपूर्ण प्रकरणांवर आणखी काही राजकीय नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आणखी तपास करणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे, असे पोलिसांनी कोर्टाला सांगितले आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी उपरोक्त माहिती कोर्टाला दिली. २४ मार्चला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर अनिक्षाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube