Bank Holiday : उद्या 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. हा राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्था बंद राहतील. (Bank Holiday) यामध्ये बँकांचाही समावेश आहे. जर तुम्हाला बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच पूर्ण करा. कारण उद्या देशभरात बँका बंद राहणार आहेत.
Hindenburg Research: काँग्रेस येत्या २२ ऑगस्टला देशातील ईडी कार्यालयांना घालणार घेराव
19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्टीच्या यादीनुसार, 15 ऑगस्ट व्यतिरिक्त, विविध सणांमुळे पुढील 15 दिवसांत बँकांना अनेक सुट्ट्या असणार आहेत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी, खासगी आणि ग्रामीण बँकांना सुट्टी असेल. यानंतर 16 आणि 17 ऑगस्ट रोजी बँका काम करतील. यानंतर रविवार असल्याने 18 ऑगस्ट रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने बँका बंद राहणार आहेत.
बँकांना अनेक सुट्ट्या
यानंतर 24 ऑगस्ट रोजी चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असेल. रविवार असल्याने 25 ऑगस्टला बँकेला सुट्टी असेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे 26 ऑगस्ट रोजी बँका या दिवशी बंद राहतील. येत्या दोन आठवड्यांत बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेची यादी पाहूनच बँकेत जाव. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानामुळे बँकांशी संबंधित महत्त्वाची काम सुट्टीच्या दिवशीही पूर्ण होऊ शकतात. सुट्टीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी एटीएम वापरा. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापर कररू शकता.
CM Shinde: अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय; राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका
शेअर बाजारही बंद राहणार का?
उद्या 15 ऑगस्ट रोजी बँकांव्यतिरिक्त शेअर बाजारात सुट्टी असेल. स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण आहे. यामुळे NSE आणि BSE वर कोणताही व्यवहार होणार नाही. अशा परिस्थितीत, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह बाजार उद्याही बंद राहतील. यानंतर शुक्रवारी बाजार सुरळीत चालेल. शनिवार व रविवार बाजाराला सुट्टी असेल.
या दिवसात बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही-