Hindenburg Research: काँग्रेस येत्या २२ ऑगस्टला देशातील ‘ईडी’ कार्यालयांना घालणार घेराव

Hindenburg Research: काँग्रेस येत्या २२ ऑगस्टला देशातील ‘ईडी’ कार्यालयांना घालणार घेराव

Congress movement against ED : अमेरिकी शॉर्ट सेलिंग कंपनी ‘हिंडेनबर्ग रिसर्च‘ने ‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे अदानी समुहाशी असलेल्या व्यावसायिक संबंध उघड केल्याची संयुक्त संसदीय समिती ‘जेपीसी’द्वारे चौकशी करण्यात यावी, या मागणीचा पुनरुच्चार करून येत्या २२ ऑगस्टला देशातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयांना (Congress) काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येणार आहे.

नफेखोरीसाठी खोडसाळ अन् निराधार आरोप; हिंडेनबर्गच्या अहवालावर अदानींची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे महासचिव, प्रभारी व प्रदेशाध्यक्षांची बैठक आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही उपस्थित होते. या बैठकीत नुकताच उघडकीस आलेला हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा चर्चिला गेला. हिंडेनबर्गवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जाणार आहे. या अहवालाने देशातील सेबीसारखी प्रख्यात नियामक संस्थेने अदानी समुहाशी तडजोड केल्याचं स्पष्ट झालं असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही असा दावाही केला जातोय.

SEBI: ..मग अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही?, राहुल गांधींची सेबी’च्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती

या घोटाळ्यात पंतप्रधान मोदी सामील असल्याचे थेट आरोप करण्यात आला. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे हितसंबंध गुंतल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांना तत्काळ बरखास्त करण्याची मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे. या बैठकीत संमत झालेल्या ठरावांची माहिती काँग्रेसचे संघटन महासचिव खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेसच्या आजच्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली. गेल्या १३ वर्षांपासून जनगणना झाली नाही. यामुळे अनेकांना आपल्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube