CM Shinde: अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय; राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका

CM Shinde: अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय; राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका

Sanjay Raut press conference : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांनी कंबर कसली असून महाराष्ट्रात अनेक नेत्यांचे दौरे सुरु आहेत. निडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे (Sanjay Raut) खासदार संजय राऊत हे जोरदार फटकेबाजी करत आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Hindenburg Research: काँग्रेस येत्या २२ ऑगस्टला देशातील ईडी; कार्यालयांना घालणार घेराव

मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आजपर्यंत आम्ही पाहिले नाहीत. मात्र, ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल, त्या दिवशी दिल्ली त्यांना पायाशीही उभं करणार नाही, असा घणाघाती हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काह दिवसांपूर्वीच राऊतांनी काही लोकांची फोटो दाखवत मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांचा टार्गेट केलं होत. आज पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार हमला चढवला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं यश मिळालं. आता विधानसभेची तयारी सुरु आहे. काल बुलढाण्यात होतो. आज अकोल्यात आहे. या राज्यातील वातावरण असं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ताबदल होईल. हे सरकार सध्या राज्याच्या तिजोरीमधून किती उधळपट्टी करत आहे? लाडक्या बहि‍णींना पैसे मिळाले पाहिजेत. त्यांचा १५०० रुपयांचा आकडा आहे. मात्र, पुढे जर आमचं सरकार आलं तर त्यामध्ये भरघोष वाढ होईल असंही राऊत म्हणाले आहेत.

राहुल गांधी धोकादायक अन् विषारी माणूस कंगना रणौतचा हल्लाबोल

मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत. असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube