Video: बापाशी काय आम्ही मुलाशी, तुमच्या गुंडांशी अन् पोलिसांशीही भिडू; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

Video: बापाशी काय आम्ही मुलाशी, तुमच्या गुंडांशी अन् पोलिसांशीही भिडू; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

Sanjay Raut Comment on CM Eknath Shinde : आम्ही बापाशी, मुलाशी, तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी भिडू. चिंता करु नका आताही भिडतो आहोत. तुमच्याकडे मोदी आणि शाहांची कवच कुंडले आहेत. ही कवच कुंडले आहेत, (Sanjay Raut ) म्हणून तुमचा आवाज आणि मस्ती सुरु आहे. ज्या दिवशी कवच कुंडले काढली जाईल तेव्हा तुम्ही भिडण्याची भाषा करणार नाही अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट प्रहार केला.

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या चिरंजीवाविषयी वक्तव्य केलं आहे. पण त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे आपल्या वडिलांनी एकदा समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करत आहेत. राज्याच्या इतिहासात वर्षा बंगल्यातून अशा प्रकारची अरेरावी कधी झाली नव्हती.

Video: शरद पवार बिग बॉस; ते जबाबदारी देतील ते काम करणार, हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुख्यमंत्री हे ४० टक्के असतील तर त्यांचे चिरंजीव हे २० टक्के आहेत. वर्षा बंगल्यावर लुटीचा माल जमा होतो आणि ते मोजण्याचे काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते हे सगळ्यांना माहिती आहे. पोलिसांना, अधिकाऱ्यांना धमकावण्याचं काम वर्षा बंगल्यातून त्यांचे चिरंजीव करत आहेत, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. शिंदेच्या गटाचे युवासेना नेते दीपेश म्हात्रेंनी मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे आणि जवळपास पाच माजी नगरसेवकांनी मशाल हाती घेतली. दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जायचे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube