‘महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही’; पवारांच्या सुरक्षेत वाढ, राऊतांचा फडणवीसांना टोला
Sanjay Raut press conference : केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Sanjay Raut) त्यावर आता संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
..म्हणून मला झेड प्लस सुरक्षा दिली असावी; शरद पवारांच्या मनात कोणती शंका?
केंद्र सरकारने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ज्याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते, विशेषतः अशावेळी जेव्हा महाराष्ट्र त्यांचाच राज्य आहे, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस जसं आमच्या मुलींचे रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीने आमच्या प्रमुख नेत्यांचंही रक्षण करू शकत नाही. यावर आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसंच, तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
Share Market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात; आयटी शेअर्स मोठ्या प्रमामत कोसळले
राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगत असतील की मी संघाची कार्यकर्ता आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? या राज्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्याप्रमाणे नेमणूक झाल्या आहेत, त्यांची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे बघूनच त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बढती आणि भरती होत नाही, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.