Download App

Asaduddin Owaisi चं मुस्लिम तरूणांना आवाहन; तरूणांनो मशिदींना जपा नाहीतर…

Asaduddin Owaisi : एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटनाचा उत्साह सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुनहरी मशिदीबाबत वाद सुरू आहे. या दरम्यान ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मशिदींचं संरक्षण करावं असं आवाहन मुस्लिम तरूणांना केलं आहे.

श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी

एका सभेला संबोधित करताना ओवेसी बोलत होते की, कोणतीही ताकद तुमच्या मनातील एकजूटता संपवू शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे आपली ताकद कायम ठेवा. तसेच यावेळी त्यांनी मुस्लिम तरुणांना आवाहन केलं की, तरुणांनो आपला समाज आणि त्याची ताकद सुरक्षित ठेवण्यासाठी मशिदींचं संरक्षण करा जेणेकरून असं होऊ नये की, आपल्या मशिदी आपल्यापासून हिसकावून घेतल्या जातील. मला खात्री आहे की, तरुण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या गल्लीला वाचवतील.

INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

दरम्यान यावेळी नवी दिल्ली नगर पालिकेच्या सुनहरी मशिद हटवण्याच्या प्रस्तावावर ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, हा प्रस्ताव संविधानाचे कलम 25 चे उल्लंघन करत आहे. ज्यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा धार्मिक हक्क देण्यात आला आहे. त्या हक्काचे उल्लंघन या प्रस्तावातून केले जात आहे. तसेच ती एक ऐतिहासिक वास्तू देखील आहे.

Seema Haider : नववर्षात सीमा हैदरने दिली गुड न्यूज, सचिनच्या मुलाची होणार आई

त्याचबरोबर या प्रस्तावामुळे कलम 29 जे सांस्कृतिक संरक्षणासाठी आहे. त्याचे देखील उल्लंघन होत आहे. तसेच यावेळी ओवेसी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारला मुस्लिमांची एवढा तिरस्कार का आहे? त्यांना मशिदींचा एवढा तिरस्कार का आहे? की त्यांना मशीन मधून येणाऱ्या आवाजाचा तिरस्कार आहे. असा सवाल विचरला आहे.

follow us

वेब स्टोरीज