UCC मुळे हिंदुंचेच नुकसान होणार; ओवैसींनी सांगतिले त्यामागील कारण

Asaduddin Owaisi On UCC: देशामध्ये सध्या समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहे. यावरुन अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना मोठे विधान केले आहे. समान नागरी कायद्यामुळे मुस्लीमांपेक्षा हिंदुचेच जास्त नुकसान होणार असल्याचे ओवैसी म्हणाले. ओवैसी म्हणाले की,  समान नागरी कायद्यातून केवळ मुस्लिमांना धडा शिकवत असल्याचं दाखवलं जात आहे. […]

Letsupp Image   2023 07 12T135210.982

Letsupp Image 2023 07 12T135210.982

Asaduddin Owaisi On UCC: देशामध्ये सध्या समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहे. यावरुन अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना मोठे विधान केले आहे. समान नागरी कायद्यामुळे मुस्लीमांपेक्षा हिंदुचेच जास्त नुकसान होणार असल्याचे ओवैसी म्हणाले.

ओवैसी म्हणाले की,  समान नागरी कायद्यातून केवळ मुस्लिमांना धडा शिकवत असल्याचं दाखवलं जात आहे. समान नागरी कायद्यातून मुस्लिमांच्या नावावर हिंदूचंच नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. समान नागरी कायदा जर देशात अस्तित्वात आला तर हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956 मधील कलम 5 रद्द आणि कलम 6 रद्द होईल. तसेच प्रॉपर्टी अॅक्ट देखील निघून जाईल. हिंदू एकत्र कुटुंब कायद्यानुसार इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते.

2015 मधील इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार अशा हिंदू कुटुंबांना 65 हजार कोटींची कर सवलत मिळाली आहे. मग समान नागरी कायदा आला तर हे राहणार नाही. हे हिंदू बांधवांना समजून घ्यावं लागेल, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

हनी ट्रॅपमध्ये अडकलं निर्मला सीतारमण यांचं अर्थ मंत्रालय; पाकिस्तानला शेअर झाली गोपनीय माहिती?

इंग्लंडचे उदाहरण देत ओवेसी म्हणाले की, “आमचे पंतप्रधान म्हणतात की देशात दोन कायदे असू शकत नाहीत, पण ब्रिटनमध्ये स्कॉटिश आणि इंग्लिश असे दोन कायदे आहेत आणि यामुळे इंग्लंड कमकुवत झाले नाही. त्याचवेळी श्रीलंका, इस्रायल आणि सिंगापूरचे स्वतःचे वैयक्तिक कायदे आहेत.”

‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान

आरएसएसवाले आमच्या माध्यमातून दुसऱ्यांचे नुकसान करत आहेत. नरेंद्र मोदी असे दाखवत आहे की आम्ही मुस्लिमांना धडा शिकवू पण नुकसान पुर्ण देशाचे होत आहे. दोन बायका फक्त इस्लाममध्ये नाही सर्व धर्मात आहे. चाईल्ड मॅरेज ॲक्ट बनवला पण ८० टक्के बालविवाह तर हिंदूंमध्ये होतात.  2000 ते 2019 पर्यंत 80 टक्के मुली बेपत्ता आहेत हा आकडा उत्तराखंडची लोकसंख्येएवढा आहे, असे ओवैसी म्हणाले.

Exit mobile version