Download App

Congress : लोकसभेपूर्वी अशोक गेहलोत-भूपेश बघेल यांच्यावर दिल्लीत मोठी जबाबदारी

INDIA Alliacne : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडी (INDIA Alliacne) लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. यामध्ये जागा वाटपांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राष्ट्रीय आघाडी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक आणि मोहन प्रकाश यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. वासनिक यांना समितीचे निमंत्रक करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. असे असताना अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. या पराभवानंतर दोन्ही नेत्यांकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याची चर्चा होती.

Uddhav Thackeray : ‘युतीचं महत्व शिका, मोदींसमोर कोण याचं उत्तर द्या’; ठाकरे गटाने टोचले काँग्रेसचे कान

आज विरोधी आघाडी भारताची बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. यूपी, पंजाब, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमधील जागांचे वाटप हे इंडिया आघाडीसमोरचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत काँग्रेसने समिती स्थापन केली आहे.

मोठी बातमी : निलंबित खासदारांची संख्या 141 वर; सुप्रिया सुळे अन् कोल्हेंसह आणखी 49 जणांवर कारवाई

दरम्यान, दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये होणाऱ्या इंडिया अलायन्सच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते दाखल झाले आहेत. टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरएलडी नेते जयंत चौधरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी नेते बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

follow us

वेब स्टोरीज