मोठी बातमी : निलंबित खासदारांची संख्या 141 वर; सुप्रिया सुळे अन् कोल्हेंसह आणखी 49 जणांवर कारवाई

  • Written By: Published:
मोठी बातमी : निलंबित खासदारांची संख्या 141 वर; सुप्रिया सुळे अन् कोल्हेंसह आणखी 49 जणांवर कारवाई

49 More Lok Sabha Opposition MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन केले जात आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज (दि. 19) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. आजच्या कारवाईनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 झाली आहे.

Pune News : ‘नोटांवर बोस, सावरकर अन् टिळकांचाही फोटो हवा’, प्रसिद्ध लेखकाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

आज कारवाई करण्यात आलेल्या खासदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा समावेश आहे. कामकाजात अडथळा आणल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

कोणते खासदार झाले सस्पेंड?

आज सस्पेंड करण्यात आलेल्या खासदारांमध्ये वी वेंथिलिंगम, गुरजीत सिंह औजला, सुप्रिया सुळे, सप्तगिरी उलाका, अदूर प्रकाश, अब्दुल समद समदानी, मनीष तिवारी, प्रद्युत बार्दोलोई, गिरधारी यादव, गीता कोड़ा, फ्रांसिस्सको सारदिन्हा, जगत रक्षम, एसआर पार्तिविवन, फारुख अब्दुला, ज्योत्सना महंत, ए गणेश मूर्ति, माला राय, पी. वेलूसामी, ए चंदकुमार, शशि थरूर, कार्ति चिंदबंरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, हसनैन मसूदी, दानिश अली, खदीदुल रहमान, राजीव रंजन सिंह, डीएनवी सेंथिल कुमार, संतोष कुमार, दुआल चंद्र गोस्वामी, रवनीत बिट्टू, दिनेश यादव, के. सुधाकरन, मोहम्मद सादिक, एमके विष्णु प्रसाद, पीपी मोहम्मद फैजल, साजदा अहमद, जसवीर सिंह गिल, महाबली सिंह, अमोल कोल्हे, सुशील कुमार रिंकू, सुनील कुमार सिंह, एचटी हसन, एम धनुष कुमार, प्रतिभा सिंह, थोल थिरुमावलन, चंद्रेश्वर प्रसाद, आलोक कुमार सुमन, दिलेश्वर कामत यांचा समावेश आहे.

भाजप अन् सेनेचे आमदार ‘रेशीमबागेत’ : आगामी निवडणुकांसाठी संघाकडून पाच मुद्द्यात कानमंत्र

नेमके कारण काय?

13 डिसेंबरला संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेला छेदत चार ते पाच जणांनी संसद आणि संसदेच्या आवारात गोंधळ घातला. यातील सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेत खासदारांच्या बसण्याच्या जागेवर उडी घेतली स्मोक अॅटॅक केला. तर नीलम आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात स्मोक कॅन्डल जाळल्या. त्यानंतर काही वेळातच या चारही जणांना पकडण्यात आले. याशिवाय या चौघांचे साथीदार ललित झा आणि विकी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

विरोधकांची मागणी काय?

दुसरीकडे या प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाकडूनही एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात खासदारांनी नारेबाजी आणि पोस्टरबाजी करत सरकारचा निषेध केला.

Prajakt Tanpure : शिखर बँक घोटाळा प्रकरणी आमदार तनपुरेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने बजावले समन्स

याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही : लोकसभा अध्यक्ष

दरम्यान, या प्रकरणात बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, या घटनेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. मी तुमच्याशी बसून चर्चा करेन. उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही. सचिवालयाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही, आम्ही करू देणार नाही, यापूर्वी घडलेल्या अशा घटनांमध्ये माजी अध्यक्षांनीही अशीच भूमिका घेतली होती, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पंतप्रधान आणि गृहमंत्री काहीच बोलत नाहीत :

शिवसेना (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी विरोधी खासदारांच्या निलंबनावर म्हणाल्या, ‘सरकारचा हा अत्याचार योग्य नाही. जनतेच्या विश्वासातून त्यांना जनादेश मिळाला आहे. केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर निवडून येऊन ते सत्तेवर आले आहेत. पण आज देशातील सर्वात सुरक्षित इमारतीवरही हल्ला होत असून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. जर आम्ही या मुद्द्यावर सरकारकडे उत्तरे मागत आहोत, तर ते आम्हाला सभागृहातून निलंबित करत आहेत. पण आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू, असा इरादाही त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube