कुणाचं नेतृत्व भावतं अन् कुणाचं खुपतं? अजितदादा की सुप्रिया ताई, Amol Kolhe म्हणतात…

कुणाचं नेतृत्व भावतं अन् कुणाचं खुपतं? अजितदादा की सुप्रिया ताई, Amol Kolhe म्हणतात…

Amol Kolhe in Khupte Tithe Gupte : झी मराठी या मराठी मनोरंजन वाहिनीवर एक मुलाखत सदराखाली कार्यक्रम घेतला जातो. खुपते तिथे गुप्ते असं या कार्यक्रमाचं नाव आहे. तर त्या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन हे अभिनेते संगीतकार आणि दिग्जर्शक अवधूत गुप्ते हे करतात. यावेळी या कार्यक्रमाचा तिसरा सीजन आहे. यामध्ये वेगवेगळ्या मान्यवारांना आमंत्रित करून त्यांच्या दिलखुलास मुलाखती घेतल्या जातात मात्र यावेळी केवळ राजकारणातील मान्यावरांनाच या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या वेळी विविध राजकीय प्रश्नांना उत्तर दिली. ( whos leadership will be like Ajit Pawar or Supriya Sule said Amol Kolhe in Avdhoot Gupte Khupte Tithe Gupte )

‘एक चूक नडली अन् महाराष्ट्राची घरे उत्तर प्रदेशने पळवली’; वाचा, काय घडलाय किस्सा!

झी मराठीच्या या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाचा अमोल कोल्हेंच्या मुलाखतीचा भाग रविवारी प्रेक्षकांना पूर्ण पाहायला मिळणार आहे. मात्र त्याअगोदर त्याचा 6 मिनिटांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहेत. त्यात अमोल कोल्हेंना नुकतचं राष्ट्रवादीत बंड झाल्याने प्रश्न विचारण्यात आला की, त्यांना कुणाच्या नेतृत्वात काम करायला आवडेल? अजित पवार की सुप्रिया सुळे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायला आवडेल. मात्र यावेळी त्यांनी अजित पवार की सुप्रिया सुळे ही निवड करणं टाळलं.

‘उसे खैरियत से रखना…’ Gadar 2 मधील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

तसेच पुढे त्यांना भाजप प्रवेशावर प्रश्न विचारला असता कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा आहे. उगाच नांगर खांद्यावर घेऊन फिरत नाही. आधी आभाळ बघून मग नांगरायचं कधी हे पाहावं लागत. हे राजकीय उत्तर आहे. पण खर उत्तर असं की… असं म्हणत या व्हिडीओमध्ये या विषयावर ते पुढे बोलतना दाखवलेले नाही. कारण या कार्यक्रमाचा हा प्रोमो आहे. उर्वरित भाग हा रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube