Ashok Gehlot : ‘देशात कुत्र्यांपेक्षा जास्त ‘ईडी’चा वावर’; गेहलोतांचे वादग्रस्त वक्तव्य

Ashok Gehlot on ED Raids in Rajasthan : राजस्थानात विधानसभा निवडणुका (Rajasthan Election) जाहीर झाल्यापासून राजकारणाचा पारा वाढला आहे. यंदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची एन्ट्री झाली आहे. गुरुवारी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर आता मु्ख्यमंत्री […]

Rajasthan Election 2023 : नागपूरमध्ये प्लॉट, दिल्लीत घर; मुख्यमंत्री गहलोतांची संपत्ती किती वाढली ?

Ashok Gehlot

Ashok Gehlot on ED Raids in Rajasthan : राजस्थानात विधानसभा निवडणुका (Rajasthan Election) जाहीर झाल्यापासून राजकारणाचा पारा वाढला आहे. यंदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची एन्ट्री झाली आहे. गुरुवारी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर आता मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे पुत्र वैभव गेहलोत यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकारानंतर गेहलोत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ईडीवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

गेहलोत यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वक्तव्य कोट करत म्हटले की ही दुर्भाग्याची गोष्ट आहे निवडणूक असणाऱ्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणावे लागत आहे की सध्या देशात कुत्र्यांपेक्षा ईडीचा जास्त वावर आहे. यापेक्षा आणखी कोणते मोठे दुर्दैव या देशासाठी असू शकते? गेहलोत पुढे म्हणाले, काँग्रेसने मागील 76 वर्षांच्या काळात देशाला एकसंघ ठेवले. इंदिरा गांधी, राजीव गांधी शहीद झाले. ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांची नावे तुम्ही इतिहासातून काढून टाकत आहात हे पाहून प्रचंड राग येतो.

कॉंग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 19 जणांचा समावेश, धारिवाल आणि जोशी यांना डच्चू?

दरम्यान, याआधी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एका सभेत ईडीवर जोरदार टीका केली. राज्यात छापेमारी करून ईडीवाले थकून गेले. रायपूर, दुर्ग, बिलासपूर, कोरबामध्ये असा एकही कोपरा शिल्लक राहिलेला नाही जिथे यांनी छापा टाकला नसेल. तरी देखील येथील काँग्रेस कार्यकर्ते, व्यापारी आणि नेते कुणीच त्यांच्यासमोर झुकले नाहीत. आज रस्त्यांवर जितके कुत्रे मांजर नसतील त्यापेक्षा जास्त संख्येत ईडी आणि आयटीवाले फिरत आहेत.

राजस्थानसाठी काँग्रेसच्या सात मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी नवीन सात आश्वासनांंची घोषणा केली आहे. यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप/टॅबलेट, 15 लाख रुपयांचा मोफत विमा इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नाही तर सीएम गेहलोत यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे जाहीर केले आहे.

MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश

– शेणखत 2 रुपये प्रति किलो दराने खरेदी
– शासकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप/टॅबलेट
– प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश मीडियमचे शिक्षण देण्याची हमी
– 15 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा
– जुनी पेन्शन योजना
– एक कोटी कुटुंबांना पाचशे रुपयांचे सिलिंडर
– कुटुंबातील महिला प्रमुखाला दहा हजार रुपये मिळतील

Exit mobile version