Download App

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून खुशखबर…संसदेत केल्या ‘या’ घोषणा!

Indian Railways Ticket Concession : देशभरात १० हजारपेक्षा जास्त ट्रेन चालत आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे विभागाने याबाबत देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोठी खुशखबर दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही घोषणा केली आहे.

रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या ४५ वर्षाच्या पुढील महिला आणि गर्भवती महिलांना स्लीपर कॅटेगरीत ६ लोअर आरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३ एसी टायरच्या प्रत्येक कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ, २ एसीमध्ये प्रत्येक कोचमध्ये तीन ते चार लोअर बर्थ आरक्षित ठेवण्यात येणार आहे.

Eknath Shinde Group Visit Silver Oak : सामंत, गोगावले शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर! कारण… – Letsupp

याव्यतिरिक्त ऑनबोर्ड तिकिट तपासणी स्टाफकडून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसाठी व्यवस्थेत अपर बर्थ देण्यात येणार आहे. तसेच त्या ट्रेनमध्ये लोअर बर्थ खाली असेल दोन्हीही देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने २०२९-२० मध्ये प्रवासी तिकीटावर ५९ हजार ८३७ कोटी रुपयांची सबसिडी दिली होती. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला साधारणपणे ५३ रुपयांची सूट दिली जात आहे. ही सुविधा ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्व प्रकारच्या नागरिकांना दिली जात आहे.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us