उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील माफिया गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली. प्रयागराजमध्ये गुंडाराज असलेल्या अतिक अहमदचा असा शेवट होईल, असं उत्तर प्रदेशच्या जनतेला वाटत नव्हतं.
भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट
प्रयागराजमध्ये अतिक अहमदची दहशत एवढी होती की, तो असताना त्याच्याविरोधात कोणी बोलतही नव्हतं. मात्र, आता अतिकच्या हत्येनंतर त्याच्या दहशतीचे किस्से समोर येत आहेत. जेलमध्ये असताना अतिकने एका बिल्डरला खंडणी मागितल्याचं समोर आलंय.
त्याचं झालं असं होतं की, अतिक अहमदवर हत्येपूर्वी जवळवास 102 गुन्ह्यांची नोंद होती. यापैकी गुन्ह्यांमध्ये अतिक अहमद साबरमती जेलमध्ये होता. कोरोनाचा काळ उलटल्यानंतर डिसेंबर महिन्यात अतिकचा मुलगा अली आपल्या टोळीच्या साथीदारांसोबत प्रॉपर्टी डिलर जीशान यांच्या घरी गेला.
अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया…
जेव्हा अतिकची टोळी आपल्या घरी येते तेव्हा जीशान आणि त्याच्या घरचे घाबरलेल्या अवस्थेत होते. जीशान घरी जात अतिकच्या मुलाने वडील अतिक अहमदला व्हॉट्सअप कॉल केला होता. या व्हॉट्सअप कॉलमध्ये अतिकने जीशानला पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
त्यावेळी एकेकाळी अतिकचा निकटवर्तीय असलेल्या जीशानने अतिकच्या खंडणीचा विरोध केला नाही मात्र, अतिकच्या विरोधात त्याने पोलिसांत गुन्हा दाखल केला. अतिकवर याआधीही खून, ताबा, खंडणीसह अनेक गुन्हे दाखल होते, मात्र यावेळी त्याच्याच जवळच्या व्यक्तींकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
…तर शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार; अजितदादांच्या भाजपसोबत जाण्यावर शिरसाटांचे मोठे विधान
अतिकचे यासोबतच अनेक किस्से आता समोर येत आहेत. यावरुन त्याची प्रयागराजमध्ये किती दहशत होती याचा अंदाज बांधता येऊ शकतो. एका उच्चभ्रू व्यक्तीकडून आणखी एका किस्सा समोर आलाय. एक उच्चभ्रू व्यक्ती आपल्या मुलाला जॅकेट घेण्यासाठी दुकानात होता. त्याचवेळी त्या ठिकाणा अतिक आला होता आणि दुकानदाराला पैसे न देताच टोपी घेऊन गेला होता.
दरम्यान, आज प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याच्या टोळीची दहशत संपलेली असली तरी उमेश पालच्या हत्येपर्यंत आतिकची दहशत प्रयागराजमधील असंख्य कुटुंबांच्या उंबरठ्यावर ठोठावत होती.