Atiq-Ashraf Murder Accused : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफची (Ashraf Ahmed)हत्या करणाऱ्या तीन शूटर्सपैकी एक असलेल्या लवलेश तिवारीची (Lovelesh Tiwari) 2018 मधील पोस्ट सोशल मीडियावर (Social media)चांगलीच व्हायरल (Post viral)झाली आहे. या पोस्टमध्ये लवलेशने पिस्तूल हाती घेतलेल्या फोटोवर लिहिले आहे की, जिस दिन होगा दिमाग खराब, उस दिन करूंगा सबका हिसाब. अनेक दिवसांपासून लवलेशच्या मनात हा प्रकार होता, हे या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
‘लोक माझे सांगाती’चा पार्ट २ येणार; शरद पवार काय नवे खुलासे करणार?
अतिक-अशरफच्या हत्येनंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघडपणे समोर येत आहेत. गँगस्टर बंधूंच्या हत्येनंतर तिन्ही शूटर्सनी आत्मसमर्पण केले आणि त्यांनी मोठे गँगस्टर बनण्यासाठी हे शूटआउट केल्याचे सांगितले. लवलेशचे वडील यज्ञ तिवारी आपल्या मुलाबद्दल सांगताना म्हणाले की, तो व्यसनाधीन आणि पूर्णपणे बिघडलेला असल्याचे वर्णन केले. वडिलांच्या म्हणण्यानुसार, लवलेशचे कुटुंबाशी फारसे संबंध नव्हते. लवलेश हा बांदा शहरात भाड्याच्या घरात राहत होता.
आता लवलेशची 2018 ची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याच्या हातात पिस्तूल असलेला एक फोटो आहे. तो त्यावर जिस दिन होगा दिमाग खराब, उस दिन करूंगा सबका हिसाब असं लिहिलं आहे. लवलेश तिवारीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. अतिक-अशरफ यांच्या हत्येबाबत पोलीस तपासात त्याच्यावर चार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तो वयाच्या 26 व्या वर्षी दोनदा तुरुंगात गेला आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला पहिल्यांदा दीड वर्षाची तर दुसऱ्या प्रकरणी एक महिन्याची शिक्षा झाली.
अवैध दारूसह पकडल्याप्रकरणी लवलेशवर शहर कोतवाली येथे तीन आणि बाबेरू कोतवाली येथे तीन गुन्हे दाखल आहेत. विनयभंग, शिवीगाळ, धमकावणे आणि पॉक्सो प्रकरणी 2020 मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने घराजवळ एका तरुणीचा खुलेआम विनयभंग केला होता. तिने विरोध केल्यावर तिला चापट मारली होती.
लवलेशचा भाऊ वेद तिवारीने पोलिसांना सांगितले होते की, लवलेश अतिक-अशरफ यांच्या हत्येच्या आठवडाभरापूर्वी घरी आला होता. रात्रभर मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी निघून गेला. तेव्हापासून घरी परतलाच नाही. जेव्हा त्याला फोन केला तेव्हा त्याचा मोबाईल बंद असल्याचे त्याने सांगितले आहे.