‘लोक माझे सांगाती’चा पार्ट २ येणार; शरद पवार काय नवे खुलासे करणार?

  • Written By: Published:
lok maze sangati sharad pawar

देशाच्या राजकारणातील  असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता या पुस्तकाचा भाग दोन लवकरच येणार आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे.

आगामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याचॆ माहिती सध्या मिळते आहे. या नव्या भागात शरद पवार यांनी सध्याच्या काळातील काही खुलासे केले असल्याची शक्यता वर्तवली आहे. कारण या पुस्तकात साल २०१४ ते २०२३ या काळातील खुलासे केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

मागच्या काही दिवसात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार, अजित पवार किंवा काही नेते भाजपसोबत जाणार याची चर्चा होत असतानाच शरद पवार यांचे हे पुस्तक येणे म्हणजे यातून नवे खुलासे होतील, असं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube