Download App

ऑस्ट्रेलियन पत्रकाराकडून PM मोदींवर माहितीपट; भारतात वार्तांकन करण्यासाठी केला होता मज्जाव

लोकसभा निवडणुकीसाठी ऑस्ट्रेलियाच्या पत्रकार अवनी डायस यांना भारतात वार्तांकण करू दिलं नाही. त्यांनी मोदींवर माहितीपट तयार केला आहे.

  • Written By: Last Updated:

ABC Documentary on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारवर एक वादग्रस्त माहितीपट (Documentary ) प्रसिद्ध करण्यात आलाय हा माहितीपट ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने केला आहे. पत्रकार आणि माहितीपटाची अँकर अवनी डायस यांच्या शब्दात या माहितीपटाचा उद्देश “ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा हस्तक्षेप उलगडणे” हा आहे. (PM Modi) माहितीपटात अनेक दावे करण्यात आले असून ऑस्ट्रेलियाच्या “राष्ट्रीय सुरक्षेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. मात्र, डॉक्युमेंटरीमध्ये कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. (Pune Accident) यामध्ये महत्त्वाचं म्हणजे, याच अवनी डायस आहे ज्यांना भारतात वार्तांकन करण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता.

हिंदू राष्ट्रवादी संघटना जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या पात्रता यादीत पाच भारतीय शाळा; वेगळा प्रयोग केलेली मुंबईची शाळाही

भारतात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. भारतातील निवडणूक प्रक्रियेचं वार्तांकन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पत्रकार अवनी डायस भारतात आल्या होत्या. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा एक माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाची सुरुवात मोदींच्या मोठ्या कटआऊटने होती. नंतर या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरएसएसशी संबंध असल्याचं सांगितलं आहे. माहितीपटात आरएसएसचं वर्णन “हिंदू राष्ट्रवादी संघटना” असं केलं आहे. डॉक्युमेंटरीमध्ये अॅडलेड विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका प्रिया चाको यांनी आरएसएसला अत्यंत उजवी निमलष्करी संघटना म्हणून संबोधलं आहे. त्यांनी डॉक्युमेंटरीमध्ये असंही म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्याचार झाले. “निमलष्करी प्रशिक्षण आणि प्रबोधन” याचा RSS शी दीर्घकाळ संबंध आहे, असंही त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.

माहिती पट – https://www.youtube.com/watch?v=Mg78a0yXzFI

“आज, आम्ही नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या ऑस्ट्रेलियातील घुसखोरीबद्दलचा आमचा तपास जाहीर करत आहोत. देश सोडण्यास सांगितलं गेलेल्या भारतीय हेरांनी यापूर्वी कधीही उघड न केलेले तपशील समाविष्ट आहेत”, असं अवनी दास म्हणाल्या. या माहितीपटात एक अत्यंत वादग्रस्त भागही आहे. यामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत पन्नून यानेही त्यांचं मत मांडलं आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये अनेक खलिस्तानी समर्थक व्यक्तींच्या विषयावर देखील चर्चा करण्यात आली आहे. “अलिप्ततावादी चळवळीशी संबंधित असलेल्या ऑस्ट्रेलियातील अनेक लोकांशी बोलून हा माहितीपट तयार करण्यात आला आहे”, असाही दावाही यामध्ये करण्यात आला आहे.

परकीय हस्तक्षेप   राज्यातील बेरोजगारीचे वास्तव ! पोलिस भरतीत एकापदासाठी तब्बल एक हजार तरुणांचे अर्ज

“नरेंद्र मोदींनी एक दशक भारतावर राज्य केलं आहे आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानुसार ते पुन्हा एकदा सत्तेवर बसले आहेत. ते त्यांच्या टीकाकारांना सहनही करत नाहीत. त्यांच्या सरकारवर परकीय हस्तक्षेप आणि परदेशात असंतुष्टांची हत्या केल्याचा आरोप आहे. आता फोर कॉर्नर्सने त्यांच्या हस्तक्षेपाचा पर्दाफाश केला आहे, असं युट्यूबवरील माहितीपटातील परिचयात दाखवण्यात आलं आहे.

follow us