BBC documentary : बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री वादाच्या भोवऱ्यात

BBC documentary : बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली : बीबीसीने बनवलेली डॉक्युमेंट्री ‘जिहादी दुल्हन'(Jihadi Vadhu) यावरून वाद सुरू झाला आहे. या माहितीपटाचे नाव ‘द शमीमा बेगम स्टोरी’ असे आहे. दरम्यान या माहितीपटावरुन ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. यापुर्वीही बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर बनवलेली डॉक्युमेंट्री वरुन वाद निर्माण झालाृ होता. भारतासह विदेशातही याचा मोठा विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

जाणून घ्या प्रकरण नेमकं आहेत तरी काय?
2015 मध्ये ब्रिटनमध्ये राहणारी शमीमा बेगम नावाची 15 वर्षीय तरुणी सीरियाला पळून गेली होती. येथे ती इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील झाली होती. येथे तिने आयएस फायटरशी लग्न केले. यानंतर सारे जग तिला ‘जिहादी दुल्हन’ या नावाने ओळखू लागले.

शमीमाचे आई-वडील मूळचे बांगलादेशी आहेत. शमीमा बेगम IS मध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव यूके सरकारने 2019 मध्ये तिचे नागरिकत्व काढून घेतले होते. दरम्यान, सीरियामध्ये आयएसचा विनाश सुरू झाला. शमीमा बेगम, आता 23 वर्षांची आहे, तिला यूकेला परत यायचे आहे, परंतु सरकार तिला परवानगी देत ​​नाही. त्याच्या ब्रिटनमध्ये परतण्याबाबतही न्यायालयात खटला सुरू आहे.

शमीमाबद्दल सहानुभूती दाखवत BBCने 90 मिनिटांची माहितीपट प्रदर्शित केला आहे. सीरियाला जाण्याच्या निर्णयामुळे शमीमा दु:खी असल्याचे BBCने आपल्या माहितीपटात दाखवल्याचे सांगितले जाते. यावरून लोकांमध्ये नाराजी आहे. ब्रिटनमधील लोकांचे म्हणणे आहे की, दहशतवादाच्या समर्थनार्थ अशी माहितीपट बनवून बीबीसीला हिंसाचाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. बीबीसीच्या या माहितीपटाचा मोठा विरोध सुरू झाला आहे. लंडनमधील BBC कार्यालयातही लोकांनी निदर्शने केली.

कोण आहे शमीमा बेगम?
शमीमा बेगम ब्रिटनमध्ये राहत होती. वयाच्या 15 व्या वर्षी, ती तिच्या दोन मैत्रिणींसह यूकेमधून सीरियाला पळून गेली होती. तिथे तिघींंनीही आयएसच्या लढवय्यांशी लग्न केले होते. तीन वर्षांहून अधिक काळ शमीमा सीरियात आयएसच्या सैनिकांसोबत राहत होती. यादरम्यान ती जिहादी दुल्हन या नावानेही प्रसिद्ध झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube