Download App

Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून विवाहपर्यंतच्या अनेक घटनांचा साक्षीदार ‘बस्ती’

Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. त्याचबरोबर अयोध्येसह देशभरातील श्रीरामांच्या संबंधित सर्वच स्थळांवर सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यामध्येच आज आपण एका अशाच स्थळाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी बाणाने रेष मारत नदी निर्माण केली होती.

सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा, शिष्टमंडळ जरांगेंना नवा ड्राफ्ट देणार; बच्चू कडूंचे वक्तव्य

हे स्थळ म्हणजे उत्तर प्रदेशमधील बस्ती या जिल्ह्यामध्ये आहे. बस्ती जिल्ह्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या संबंधित अनेक आख्यायिका घडल्याच्या सांगितल्या जातात. अशीच एक आख्यायिका आहे. ती म्हणजे ज्यावेळी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचं स्वयंवर झालं होतं. त्यानंतर ते जनकपुरवरून अयोध्येमध्ये परतत होते.

ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड, अनिल परबांनी थेट पुरावे दाखवले

त्यावेळी रस्त्यामध्ये माता सीतेला तहान लागली. मात्र आसपास कुठेही पाणी उपलब्ध नव्हतं. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी आपल्या भात्यातून बाण काढला आणि एक रेष आखली रेष मारताच त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह निर्माण झाला आणि हेच पाणी पिऊन माता सिताने आपली तहान भागवली. या आख्यायिके नुसार आणि पौराणिक कथांनुसार रामाने रेष मारून निर्माण केलेल्या या नदीला रामरेखा नदी म्हणून ओळखले जाते.

Ira Khan: ‘त्या’ फोटोमुळं प्रचंड ट्रोल झाली आमिरची लाडकी लेक आयरा; नेटकरी म्हणाले…

सध्या या परिसरामध्ये रामरेखा मंदिर देखील बनवलेलं आहे. यावर ज्यावर रामायण कालीन प्रसंगाची चित्र काढण्यात आलेली आहेत. तसेच बस्ती हा जिल्हा रामायणातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार आहे. असं सांगितलं जातं की, श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ देखील याच जिल्ह्यात झाला होता. तसेच श्रीरामांची बहिण शांता हीच निवासस्थान देखील या जिल्ह्यात होतं. ज्या ठिकाणी सध्या शृंगीनारी येथे माता शांताच मंदिर आहे.

त्याचबरोबर याच जिल्ह्यामध्ये भगवान श्रीरामांचे गुरु महर्षी वशिष्ठ यांचा आश्रम होता. याच ठिकाणी राहून प्रभू श्रीरामांनी त्यांच्या तिन्ही भावांसह महर्षी वशिष्ठांकडून प्रारंभिक विद्या ग्रहण केली. त्यामुळे अशाप्रकारे प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून विवाह पर्यंतच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या बस्ती जिल्ह्यातून जनकपुर ते आयोध्या जाणारा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात आला आहे. ज्याला राम जानकी मार्ग म्हणून ओळखले जात.

follow us