Download App

‘तरुणांनो, मशीद आपण गमावली..,’; राम मंदिरावरुन ओवेसी नेमकं काय म्हणाले?

Asaduddin Owaisi On Ram Mandir : तरुणांनो आपण आपली मशीद गमावलीयं, तिथं काय केलं जातंय, गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं आवाहन एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मुस्लिम समाजातील तरुणांना केलं आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीदीच्या वादानंतर अखेर आता येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. अशातच राजकीय नेत्यांकडून मोठ-मोठी विधाने केली जात आहेत.

Randeep Hooda: लग्न तर खूप संस्कारांनी केलं अन् आता.. हनिमूनच्या फोटोंमुळे अभिनेता ट्रोल

ओवेसी पुढे बोलताना म्हणाले, तरुणांनो आपण आपली मशीद गमावलीयं. तिथं काय केलं जातयं, ते आपण बघत आहोत. तुम्हाला याचा त्रास होत नाही का? जिथं आपण 500 वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं, आज ती जागा आमच्या हातामध्ये नाही. आणखी तीन ते चार मशिदींबाबत षड्यंत्र सुरु असून यामध्ये दिल्लीतल्या मशिदीचाही समावेश आहे. या शक्ती तुमच्या मनातून ऐक्य काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी परिस्थिती तुम्हाला पाहिजे आहे का? या गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं आवाहन ओवेसी यांनी केलं आहे.

John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का

तसेच तुमची ताकद आणि तुमची एकता कायम ठेवा. मशिदी लोकवस्तीत ठेवा. कारण या मशिदी आपल्याकडून काढून घेतल्या जातील. आजचे तरुण उद्या म्हातारे होणार आहेत. त्यामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला आणि शहराला कशी मदत करु शकतो, याचा विचार केला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ होणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. येत्या 20 जानेवारी रोजी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.

14 जानेवारीला संक्रांतीनंतर 10 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुलं होणार असल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे.

follow us