Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणार्या श्रीरामाच्या (Ayodhya Ram Mandir) अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुख यांना मेलद्वारे बॉम्बस्फोटाने उडवणार असल्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आले आहे. हा मेल मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत: आयएसआयशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी तक्रारीवरून सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांसह एटीएसचे पथक तैनात करण्यात आलं असून ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
‘राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दोन पक्ष BJP ला पाठिंबा देणार’; राणा दाम्पत्याचा मोठा दावा
“देवेंद्र तिवारी महान गोरक्षक बनले आहे, ते अनेकदा बचावले आहेत, आमचे लोक यूपीत पोहोचले आहेत, आता ना राम मंदिर, ना देवेंद्र तिवारी, ना योगी, त्यांना बॉम्बने उडवणार. जे उत्सवासाठी तयारी करत आहेत, आम्ही त्यांचं शोकात रूपांतर करू,’ अशा मजकूराचा धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे आता अयोध्येतील नागरिकांमध्येही एकच भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
‘गुजरातला जाणारे प्रकल्प रोखण्याची हिंमत राणेंमध्ये नाही’; ‘पाणबुडी’ प्रकल्पात राऊतांची ठिणगी
येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ होणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. येत्या 20 जानेवारी रोजी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.
Sharad Pawar : मी 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही…
14 जानेवारीला संक्रांतीनंतर 10 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुलं होणार असल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे.
दरम्यान, येत्या 20 जानेवारीला राम मंदिर सोहळ्यासाठी देशभरातून अनेक नागरिकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. 20 ते 24 जानेवारी दरम्यान, देशातून भाविक भक्त रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येणार आहेत. दिवाळीसारखा हा सोहळा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. अशातच आता बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.