Ayodhya Ram Temple : काँग्रेसने अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा Ayodhya Ram Temple सोहळ्यात सहभागी होण्याला नकार दिला आहे. यानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हा कार्यक्रम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसभोवती केंद्रित असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मणिपूरपासून सुरु झाल्यानंतर आता नागालॅंडमध्ये आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 22 जानेवारीला अयोध्येतील रामलल्लाचा ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रमात बदलला आहे. हा कार्यक्रम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसभोवती केंद्रित झाला आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वाद; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
ते पुढं म्हणाले की, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची स्थिती चांगली असून या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर राहुल गांधी म्हणाले की हा राजकीय कार्यक्रम झाला आहे. हिंदू धर्मातील प्रमुख लोकांनीही (शंकराचार्य) हा धार्मिक कार्यक्रम नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी हे आमंत्रण नाकारण्याचे हेच कारण असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील कोणत्याही व्यक्तीला दर्शनासाठी जायचे असेल तर तो जाऊ शकतो, असेही राहुल गांधी म्हणाले.
‘भारत जोडो न्याय यात्रे’चा नागालँडमध्ये प्रवेश
‘भारत जोडो न्याय यात्रा’ 100 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. या प्रवासात 6,713 किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. यावेळी भारत जोडो न्याय यात्रेचा काही प्रवास बसने असेल तर काही ठिकाणी चालतही असणार आहे. या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे.
OTT Release: आता घर बसल्या बघता येणार ‘मेरी ख्रिसमस’ ,’या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
गतवर्षीच्या जानेवारी महिन्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) संपन्न झाली. 136 दिवसांत काँग्रेसची भारत जोडो यात्रा 12 राज्यांतील 75 जिल्हे आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून गेली होती. या यात्रेचा उद्देश भारताला एकसंध करण्याबरोबरच देशाला बळकट करणे हा असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. ही यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि सुमारे 4000 हुन अधिक किलोमीटरचे अंतर कापून 136 दिवसांनी काश्मीरमध्ये सांगता झाली होती.