Punjab : खलिस्तानी अतिरेकी पन्नूकडून CM मान यांना जीवे मारण्याची धमकी; यंत्रणा अलर्ट
Punjab News : पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यात (Punjab News) मोठी खळबळ उडाली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू यानेच ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान यांना धमकी देताना पन्नूने सर्व गँगस्टर्सना एकत्र येण्याचेही आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री राज्यातील गँगस्टर्सविरोधात झिरो टॉलरन्स धोरणाची अंमलबजावणी करत आहेत. त्यामुळे या गँगस्टर्सचे धाबे दणाणले आहेत. राज्य सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईचा फायदा घेण्याचा प्रयत्न पन्नूकडून केला जात आहे.
PM Modi : ‘आधी पुरावे द्या, नक्कीच विचार करू’ पन्नू प्रकरणी PM मोदींचे अमेरिकेला उत्तर
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने याआधीही व्हिडिओ जारी करत भारतावर हमासारख्या हल्ल्याची धमकी दिली होती. तसेच भारतीय संसदेवर 13 डिसेंबर रोजी हल्ला करणार असल्याचीही धमकी दिली होती. 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. या हल्ल्याच्या स्मृतीदिनीच हल्ला करण्याची धमकी पन्नूने दिली होती.
यानंतर आता पन्नूने पुन्हा एकदा धमकी दिली आहे. यावेळी त्याने थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना धमकावले आहे. या धमकीनंतर पंजाबातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. पंजाब राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की गँगस्टर विरोधात आम्ही कठोर कारवाई सुरू केली असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
Khalistan News: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने थेट अमित शहा आणि एस जयशंकर यांना दिली धमकी
पन्नू भारतावर का चिडलेला ?
UAPA अंतर्गत पन्नूवर भारतात बंदी आहे आणि तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) वाँटेड यादीत आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे जुळे पासपोर्ट आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत हरदीपसिंह निज्जरच्या हत्येसाठी भारतीय नेते आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची धमकी दिली होती. निज्जर भारतातून कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम करण्यासाठी गेला होता. तेथे तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात आला आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सामील झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याची कॅनडात हत्या झाली होती.