Download App

“रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे” : अयोध्येतील सुप्रसिद्ध घोषणांचे शिल्पकार कोण होते?

अयोध्या : सुमारे 492 वर्षांपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची इच्छा पूर्ण झाली. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत मंदिराचा आणि मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. मंदिर उभारणीचा हा प्रवास प्रचंड मोठा होता. यात अनेक रामभक्तांनी प्राणांची आहुती दिली तर अनेकांनी सर्वस्व अर्पण केले. प्रत्येकाने शक्य असेल ते सगळे केले.

यापैकी एक आहेत बाबा सत्यनारायण मौर्य.

बाबा सत्यनारायण मौर्य यांनीच “रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे”, खून-पसिना बहाऐंगे, मंदिर वही बनाएंगे अशा अनेक प्रसिद्ध घोषणा लिहिल्या. याच घोषणांच्या आधारे मागील अनेक वर्षांपासून कारसेवकांना स्फुर्ती मिळत होती. (Baba Satyanarayana Maurya wrote many famous slogans in Ayodhya.)

Letsupp मराठीच्या वृत्ताची ठाकरेंकडून दखल : कारसेवक संतोष मोरेंना गोदा किनारी ‘खास सन्मान’

कोण आहेत बाबा सत्यनारायण मौर्य?

बाबा सत्यनारायण मौर्य यांना भटके बाबा म्हणूनही ओळखले जाते. सध्या ते इंदूर, उज्जैन आणि मुंबईमध्ये असतात.रामभक्तीत तल्लीन झालेले बाबा मौर्य सुरुवातीच्या काळात शिक्षण पूर्ण करून मंदिर आंदोलनात सहभागी झाले. चित्रकलेची आवड असलेल्या बाबांनी गेरूच्या साहाय्याने रस्त्यांवर आणि परिसरातील प्रत्येक भिंतीवर घोषणा लिहिण्यास सुरुवात केली. यापैकी एक घोषणा होती- “रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे” या घोषणेने प्रत्येक राम भक्तामध्ये एक नवी ऊर्जा संचारली.

सिंघल यांनी बाबांची गाणी आणि घोषणांची कॅसेट रेकॉर्ड केली :

बाबा मौर्य यांनी सांगितले की, उज्जैनमध्ये शिकत असताना मंदिर आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मी येथील भिंतींवर नारे लिहिण्यास सुरुवात केली. 1990 मध्ये मित्रांसह अयोध्येला गेलो होतो. इथे त्यांनी भिंतींवर घोषणा लिहिण्यास सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी मी लिहिलेले घोषवाक्य वाचले तेव्हा त्यांनी याच घोषणांच्या आधारे आंदोलन पुढे चालू ठेवण्यास सांगितले.

Ayodhya : 10 मंत्रोच्चार, 10 वेळा स्नान अन् 10 दान… अशी आहे PM मोदींची दिनचर्या

सिंघल यांना बाबांच्या गाण्यांची आणि घोषणांची कॅसेटचे रेकॉर्डिंग करून घेतले. या घोषणा कालांतराने मंचावरही घुमू लागल्या. यानंतर बाबांना हळूहळू मंचप्रमुख घोषित करण्यात आले. उज्जैनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बाबांनी मंचावरूनच “रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे, खून-पसिना बहाऐंगे, मंदिर वही बनाएंगे, रक्त देंगे, प्राण देंगे मंदिर का निर्माण करेंगे” अशा जगप्रसिद्ध घोषणा दिल्या.

follow us

वेब स्टोरीज