Download App

Odisha Train Accident अन् 288 मृत्यू टाळता आले असते? “मला पूर्वकल्पना होती,” बागेश्वर बाबांच्या दाव्याने खळबळ

Bageshwar Baba : ओडिसातील तीन रेल्वेंच्या अपघातानं (odisha train accident)संपूर्ण देश हळहळला आहे. या रेल्वे अपघातानं संपूर्ण रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीत वाढ करण्याची केली जात आहे. त्यातच आपल्या विवादीत वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असलेले बागेश्वर बाबांनी मोठा दावा केला आहे. याबद्दल बागेश्वर बाबा म्हणाले की, ओडिसातील या दुर्घटनेचे संकेत त्यांना घटनेच्या आधीच मिळाले होते. आता बागेश्वर बाबांच्या अशा वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Eknath khadse : माघारी फिरणार नाही! तावडेंची ऑफर धुडकावतं खडसेंनी कापले परतीचे दोर

दरम्यान बागेश्वर बाबांचे गुजरातच्या वडोदरामध्ये (Vadodara) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे. यावेळी बाबांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, देशात घडणाऱ्या मोठ्या घटणांचे संकेत त्यांना अगोदरच समजतात का? त्यावर बागेश्वर बाबांनी सांगितले की, हो, मला घडलेल्या घटनांची आधीच माहिती मिळते ही एक गोष्ट आहे, टाळणे दुसरी गोष्ट आहे. बाबा म्हणाले की, महाभारताचे युद्ध होणार हे भगवान कृष्णालाही माहित होतं पण ते ते टाळू शकले का? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

Kabul News : तालिबान्यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच; 80 विद्यार्थिनींवर केला विषप्रयोग

बागेश्वर बाबांच्या या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बागेश्वर बाबा म्हणाले की, या देशाचे आणि जगाचे काहीही वाईट घडू नये, यासाठी आपण आपल्या देवांच्या चरणी रोज प्रार्थना करतो. बाबांनी सांगितले की, वाऱ्याच्या वेगावरून आपल्याला सिग्नल मिळू शकतात कारण हा वाऱ्याच्या पुत्राचा दरबार आहे.

बागेश्वर बाबांच्या या दाव्यावरुन विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावर कॉंग्रेस नेते उदित राज यांनी म्हटलंय की, बागेश्वर बाबांना जर या मोठ्या घटणांचे संकेत आधीच मिळत असतील तर त्यांनी याची माहिती का सांगितली नाही? उदित राज म्हणाले की, बाबा बागेश्वर राजकारण करतात आणि त्यांचा अजेंडा हिंदुराष्ट्र आहे. बागेश्वर बाबांचा धर्माशी काहीही संबंध नसून ते राजकारण करत असल्याचा आरोप उदित राज यांनी केला आहे.

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला होता आणि मोठ्या संख्येने लोक जखमी झाले होते. हा देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.

Tags

follow us