Kabul News : तालिबान्यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच; 80 विद्यार्थिनींवर केला विषप्रयोग
Poison Attack on Afghanistan Girls : अफगानिस्ताणमध्ये ( Afghanistan ) 2021 मध्ये तालिबान ( Taliban ) सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना कमी करण्यात आले आहे. त्यातच आता अफगानिस्ताणच्या सर-ए-पुल ( Sar-E-Pool ) प्रांतात शनिवार आणि रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. ( Poison Attack on Almost 80 Girls in Afghanistans Taliban Rule )
शिक्षणाच्या प्रांत विभागाचे प्रमुख मोहम्मद रहमानी यांनी सांगितलं की, सर-ए-पुल प्रांतातील संगचरक जिल्ह्यात पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थींनींवर विषप्रयोग करण्यात आला. दोन शाळांमधील जवळपास तब्बल 80 विद्यार्थींनींना विष दिल्याची ही घटना आहे. यामध्ये नसवान-ए-कबोद आब या शाळेतील 60 तर नसवान-ए-फैजाबाद 17 मुलींवर हा विषप्रयोग करण्यात आला आहे.
Taliban government : यूएस-नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक झोनमध्ये रूपांतरित करणार
त्यांनी पुढे असं देखील सांगितलं की, या दोन्ही शाळा जवळ-जवळच आहेत. तर या मुलींना एका मागे एक असे लक्ष्य केले जात आहे. आम्ही या मुलींना रूग्णालायात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. तर वैयक्तिक वादातून या शाळांना असे नुकसान पोहचवण्याचा हा प्रयत्न असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शिक्षणानंतर आता तालिबान सरकारची महिलांना ‘खाण्यावर’ बंदी
2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. कारण या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना कमी करण्यात आले आहे.
या अगोदर अफगानिस्ताणमध्ये 2015 मध्ये अशाच प्रकारे शालेय मुलींना विष देण्यात आलं होत. मात्र त्यावेळी तेथे तालिबानची सत्ता नव्हती. त्यावेळे तब्बल 600 शालेय मुलींवर विष प्रयोग करण्यात आला होता. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच घटना ईराणमध्ये देखील घडली होती. त्यानंतर आता पुन्हा हा प्रकार अफगानिस्ताणात समोर आला आहे.