Download App

Paracetamol Tablets सह ‘ही’ 14 औषधं घातक; केंद्र सरकारने घातली बंदी

Ban on 14 types of drugs including paracetamol combination : केंद्र सरकारने आरोग्याला बाधा निर्माण करणाऱ्या औषधांना आळा बसावा म्हणून 14 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधांवर बंदी घातली आहे. यामध्ये निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉल डिस्पर्सिबल गोळ्या, क्लोफेनिरामाइन मेलिएट आणि कोडीन सिरप या औषधांचा समावेश आहे. या औषधांचा वापर मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. या औषधांचे वितरण, उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. DGCI (ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ने ही बंदी घातली. सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली.

तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे सरकारने हे पाऊल उचलले आहे. ताप, डोकेदुखी, मायग्रेन, स्नायू दुखणे, दाताचे दुखणे, संधिवात दुखणे, स्पॉन्डिलायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, पीरियड वेदना इ. मध्ये निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉलची रचना असलेली औषधे घेतली जातात. या औषधांच्या अनियंत्रित वापरामुळे यकृत, मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

पंकजा एकाकी पडल्यात, मुंडेंच्या नाराजीवरून छगन भुजबळांनी भाजपला डिवचले

या यादीमध्ये Nimesulide + Paracetamol Dispersible Tablets, Chlopheniramine Maleate + Codeine Syrup, Pholcodine + Promethazine, Amoxicillin + Bromhexine and Bromhexine + Dextromethorphan + Ammonium Chloride + Menthol, Paracetamol + Bromhexine + Phenylephrine + Chlorpheniramine + Guaiphenesin and Salbutamol + Bromhexine यांचा समावेश आहे.

तज्ज्ञ समितीने सांगितले की, अशी निश्चित डोस कॉम्बिनेशन औषधे मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 26A अंतर्गत सरकारने अशा FDC वर बंदी घातली.

FDC औषधांना अशी औषधे म्हणतात, ज्यामध्ये एका टॅब्लेटमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असते. तत्यांना ‘कॉकटेल ड्रग’ ड्रग्ज असेही म्हणतात. 2016 मध्ये, सरकारने 344 औषधांच्या मिश्रणाचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही समिती स्थापन केली होती. कोणत्याही वैज्ञानिक आकडेवारीशिवाय ही औषधे रुग्णांना विकली जात आहेत. शिवाय, या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्षष्टता नाही आणि यामुळे मानवाला धोका पोहोचू शकतो. परिणामी, या औषधांचे उत्पादन, विक्री आणि करण्याला बंदी घालावी, असं या समितीने म्हटले होतं.

Tags

follow us