पंकजा एकाकी पडल्यात, मुंडेंच्या नाराजीवरून छगन भुजबळांनी भाजपला डिवचले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (17)

मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे या भाजपात एकाकी पडल्या आहेत. असे वक्तव्य केले आहे. ते म्हणतात पक्ष त्यांच्या वरिष्ठत्त्वाचा आणि त्यांच्या वडिलांनी पक्षसाठी जे काम केले आहे, त्याचे मोजमाप करताना पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करत आहे का, असे त्यांना वाटत असावे, असे मला तर सातत्याने वाटते त्यांनी पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटावे आणि मनमोकळे केले पाहिजे, त्यांना सांगितले पाहिजे.

पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर म्हणाल्या मी अमित शहांना भेटणार आहे. त्या म्हणतात..माझ्या कुटुंबियांसाठी मी राजकारणात नाही. मला जर भूमिका घ्यायची असेल तर अशीच तुम्हाला बोलवेल व भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी बंदूक चालवावी एवढे खांदे मला भेटले नाही. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या मी विसावू देणार नाही, असा इशारा यावेळी पंकजा मुंडेंनी दिला.

3 जून 2023 पर्यंत मी जे बोलले त्या प्रत्येक भूमिकेवर मी ठाम आहे. माध्यमांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा याची संधी मी दिली नाही. अनेक लोक निवडणुका हरले त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात 2 डझन आमदार-खासदार झाले. मी त्यात बसत नसेल तर लोक चर्चा करणार. आता मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. मी त्यांना वेळ मागितली आहे. त्यांच्याशी मी मनमोकळे बोलणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज?

मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. यामुळे त्या राष्ट्रवादी किंवा रासपमध्ये जाऊ शकतात असं बोललं जातं. नुकतंच एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मी भाजपमध्ये आहे, भाजप माझा पक्ष थोडीच आहे, असं वक्तव्य केलं होतं. तसंच वडिलांसोबत भांडण झालं तर भावाच्या घरीही जाऊ शकते, असं सूचक वक्तव्य करत त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला होता. अशातच आज एकनाथ खडसे यांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्या भाजप सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us