Bank Holidays in Nov 2023 : आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. देशभरात दिवाळीचा (Diwali)फिवर दिसत आहे. त्यामुळे बँकांनाही (Bank)बऱ्याच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. बँकेच्या ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने (RBI)बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तुम्हालाही या महिन्यात बँकेत काही महत्वाची कामं करायची असतील तर बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहूनच आपल्या कामाचं नियोजन करावं.
Maratha Reservation : गाडीची तोडफोड; मंत्री हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया…
अर्धा महिना बँका बंद राहणार
नोव्हेंबर महिन्यामध्ये देशातील सर्वात मोठा सण दिवाळी आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये बँका अनेक दिवस बंद राहतात. नोव्हेंबरमध्ये जवळपास 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर गोवर्धन पूजा, छठ पूजा आदी सणांच्या देखील सुट्ट्या असणार आहेत.
Israel Hamas War : निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलचा एअर स्ट्राईक; 50 जण ठार
नोव्हेंबर 2023 मधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी…
1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बंगळुरू, इन्फाळ आणि शिमला येथे बँका बंद.
5 नोव्हेंबर – रविवारची सुट्टी
10 नोव्हेंबर – गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर – दुसरा शनिवार
12 नोव्हेंबर – रविवार
13 नोव्हेंबर – गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनऊ येथील बँकांना सुट्टी असेल.
14 नोव्हेंबर – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बळी प्रतिपदा)/ विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.
15 नोव्हेंबर – गंगटोक, इन्फाळ, कानपूर, कोलकाता, लखनऊ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीयेमुळे बँका बंद राहतील.
19 नोव्हेंबर – रविवारची सुट्टी
20 नोव्हेंबर – पाटणा आणि रांचीमध्ये छठपूजेनिमित्त बँका बंद राहतील.
23 नोव्हेंबर – सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
25 नोव्हेंबर – चौथा शनिवार
26 नोव्हेंबर – रविवार
27 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इन्फाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
30 नोव्हेंबर – कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
नोव्हेंबर महिन्यात आपल्याला बँकांसंबंधी काही महत्वाची कामं करायची असल्यास वर दिलेली यादी पाहूनच आपल्या कामांचं नियोजन करावं, अन्यथा आपली अडचण होण्याची दाट शक्यता आहे.