Maratha Reservation : गाडीची तोडफोड; मंत्री हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया…

Maratha Reservation : गाडीची तोडफोड; मंत्री हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया…

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागणार असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Musrif) यांनी दिली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जाळपोळ, गाड्यांची तोडफोड करण्याचं सत्र सुरु आहे. अशातच आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची आज सकाळच्यादरम्यान गाडी फोडण्यात आली. त्यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha Reservation : आमदारांचं घर पेटवलं; 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा होत आहेत. आजही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी बोलावली आहे. या बैठकीचं सर्वच पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागेल, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे.

Raj Thackeray : प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना भावनिक पत्र…

मागील दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. शांततापूर्ण सुरु असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कथिक व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर मराठा आंदोलकांनी बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवल्याचं समोर आलं. त्यानंतर माजलगाव नगरपरिषदेला मराठा आंदोलकांनी आग लावल्याची घटना घडली होती. प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर मराठा आंदोलकांनी आपला मोर्चा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरी वळवला होता. संचारबंदी लागू असतानाही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत क्षीरसागर यांच्या घराला आग लावली होती.

Priyanshu Panuli: प्रियांशू पैन्युलीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट’ची शेअर केली एक झलक

बीडमध्ये जाळपोळाच्या घटना घडत असतानाच आता या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. अहमदनगर, पुणे , नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाळपोळ करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावरुन मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करीत सडकून टीका केल्याचंही दिसून आलं होतं.

Maratha reservation : जाळपोळीचं लोण आता नगरमध्येही, रोहित पवारांच्या मतदारसंघात जाळले टायर

दरम्यान, बीडमध्ये जाळपोळाच्या घटनेनंतर आज सकाळच्या सुमारास सत्ताधारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील आकाशवाणी निवासस्थानाबाहेर हसन मुश्रीफ यांची गाडी लावण्यात आली होती. वैजापूरहुन आलेल्या मराठा आंदोलकांनी हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मंत्रालय आणि आकाशवाणी निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube