12 वर्षीय चिमुरडीच्या हत्येने हादरला बंगाल; 72 तासांत मुख्य आरोपीचा एन्काउंटर, योगी पॅटर्नची चर्चा

12 वर्षांच्या एका निष्पाप मुलीचा देह जेव्हा एका गोणीत कोंडलेला आढळला, तेव्हा संपूर्ण बंगालचा श्वास रोखला गेला.

Untitled Design (12)

Untitled Design (12)

Bengal shaken by the murder of a little girl : दक्षिण 24 परगणाच्या बारुईपूरमधील 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर संपूर्ण बंगाल हादरले होते. पण या प्रकरणाने आत्तापर्यंत जो प्रवास केला, तो एखाद्या थरारपटापेक्षा कमी नाही. दक्षिण 24 परगणाच्या बारुईपूरमधील तो रविवार… 12 वर्षांच्या एका निष्पाप मुलीचा देह जेव्हा एका गोणीत कोंडलेला आढळला, तेव्हा संपूर्ण बंगालचा श्वास रोखला गेला. एका चिमुरडीचा जीव घेणारे ते नराधम मोकाट असताना, जनक्षोभ उसळणे स्वाभाविक होते. पण या प्रकरणाने जो प्रवास केला, तो एखाद्या थरारपटापेक्षा कमी नाही…

सगळी घटना सुरू झाली ती 4 जुलैला. 12 वर्षांची एक चिमुरडी खेळायला म्हणून घराबाहेर पडली, पण ती पुन्हा घरी परतलीच नाही. आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली, पण कुठेच काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी, 5 जुलैच्या सकाळी सूर्यपूर गावातील एका तलावात एका गोणीत तिचा मृतदेह आढळला. या बातमीने संपूर्ण परिसर हादरला. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे प्राथमिक निष्कर्षातून समोर आले.

जनक्षोभ आणि हिंसाचार : मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर लोकांचा राग अनावर झाला. जमावाने रस्ते आणि रेल्वे ट्रॅक रोखून धरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण जमावाने पोलिसांच्या गाड्या फोडल्या. त्याच गर्दीत, संशयाच्या आधारावर इंद्रजीत मंडल नावाच्या एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली (मॉब लिंचिंग), ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

72 तासांचा तो ‘अल्टिमेटम’ आणि घटनाक्रम : या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, पुढील 72 तासांत दोषींवर कठोर कारवाई होईल, असा जाहीर इशारा दिला होता. लोकांचा रोष आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनावर मोठा दबाव होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपी प्रभास मंडलचे ‘एनकाउंटर’ झाले. या घटनाक्रमामुळे आता बंगालमध्ये ‘एनकाउंटर संस्कृती’ आणि राजकीय इशाऱ्यांचा योगायोग यावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

उत्तर प्रदेशचा ‘योगी पॅटर्न’ आणि बंगालची रणधुमाळी : या घटनेनंतर बंगालमध्ये थेट उत्तर प्रदेशच्या ‘योगी पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे मॉडेल, आता बंगालच्या मातीत वापरले जात असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने याला ‘जंगल राज’ची सुरुवात म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात, न्यायाची मागणी एका बाजूला पडली आहे की काय, असा संशय सामान्य नागरिकांना वाटू लागला आहे.

तपासाचा प्रवास आणि एन्काउंटर : पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही तपासले. यात मुख्य आरोपी प्रभास मंडल आणि त्याचे साथीदार आनंद सरदार, दिवाकर सरदार व कबीर मोल्ला यांची नावे पुढे आली. मुख्य आरोपी प्रभासला अटक केल्यानंतर, पोलीस त्याला 8 जुलैच्या रात्री क्राईम सीन रीक्रिएशनसाठी घटनास्थळी घेऊन गेले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिथे त्याने एका सब-इन्स्पेक्टरची पिस्तूल हिसकावली आणि गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रत्युत्तरात प्रभास ठार झाला.

PoK Violence : पाकच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर का धगधगतंय ?

पोस्टमार्टम आणि डिजिटल एक्स-रे : या एनकाउंटरनंतर पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सावध होते. कोणताही आरोप होऊ नये म्हणून, प्रभासच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यापूर्वी पहिल्यांदाच ‘डिजिटल एक्स-रे’ करण्यात आला. शरीरात किती गोळ्या होत्या आणि दिशा काय होती, हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट करणे हा त्यामागचा उद्देश होता.

आरोपीची आई आणि तिची भूमिका : या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरला तो आरोपीच्या आईचा निर्णय. आपल्या मुलाच्या एनकाउंटरची बातमी समजताच तिने स्पष्टपणे सांगितले की, माझ्या मुलाने जे क्रूर कृत्य केले, त्याला हीच शिक्षा मिळायला हवी होती. तिने मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास आणि पाहण्यासही नकार दिला.

सहा सदस्यांची विशेष तपास पथके (SIT) काम करत आहेत. हिंसाचार भडकवणाऱ्या 200 जणांची ओळख पटलीय. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी दोषींना फाशीची शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. पण प्रश्न हाच आहे की, या राजकीय वादाच्या धूळपाटीत त्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का? काही तासांत झालेली ही कारवाई हा न्यायाचा मार्ग आहे की राजकीय दबावाचे प्रतीक, हे येणारा काळच ठरवेल.

Exit mobile version