Bengaluru Stampede: बेंगळुरू चेंगराचेंगरी (Bengaluru Stampede) प्रकरणात आरसीबी (RCV) आणि राज्य क्रिकेट मंडळाविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कर्नाटक सरकारचा (Karnataka Government) अहवाल आल्यानंतर ही मंजुरी देण्यात आली.
विराट कोहलीच्या (Virat Kohli)रॉयल चॅलेंजर्स (Royal Challengers) बंगळुरू (आरसीबी) संघाने नुकत्याच झालेल्या आयपीएल 2025 मध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर विजय परेड दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. आता कर्नाटक सरकारचा (Karnataka Government) अहवाल समोर आला असून सरकारने चेंगराचेंगरीसाठी आरसीबीला जबाबदार धरलंय. तसेच, अहवालात क्रिकेटपटू विराट कोहलीच्या व्हिडिओचाही उल्लेख करण्यात आला आहे.
‘विधानसभा अध्यक्ष दुतोंडी, ते पक्षपातीपणा करतात’; भास्कर जाधव संतापले, DCM शिंदेंचाही घेतला समाचार
कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजय परेडसाठी ‘शहर पोलिसांची परवानगी न घेता’ लोकांना आमंत्रित केले होते.
कर्नाटक सरकारने अहवाल केला सादर
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. सरकारने अहवालात म्हटले आहे की, आरसीबी व्यवस्थापनाने 3 जून रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. ज्या दिवशी आरसीबीने 28 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती त्या दिवशी संघाने पोलिसांना संभाव्य विजय परेडची माहिती दिली होती.
अहवालात म्हटले आहे की विजय परेडबद्दल पोलिसांना माहिती देणे ही केवळ सूचनावजा माहिती होती. दिलेली माहिती ही पोलिसांकडून घेतलेली कायदेशीर परवानगी नव्हती. अशा कार्यक्रमांसाठी किमान 7 दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक आहे. या प्रकरणात, आयोजकाने परवाना प्राधिकरणाकडे विजय परेडसाठी कोणताही अर्ज सादर केला नव्हता.
कब्बन पार्क पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी 03 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता विजय परेडसाठी केएससीएने केलेल्या विनंतीला परवानगी दिली नाही. अंतिम सामन्याच्या संभाव्य निकालांसाठी, म्हणजेच आरसीबीचा विजय किंवा पराभव, दोन्हीसाठी मोठी गर्दी जमली असती म्हणून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे केलेल्या व्यवस्थेबद्दल माहितीचा अभाव आणि संभाव्य अडथळे लक्षात घेता परवानगी नाकारण्यात आली.
विराट कोहलीच्या व्हिडिओचा केला उल्लेख
अहवालात म्हटले आहे की, पोलिसांशी सल्लामसलत न करता आरसीबीने दुसऱ्या दिवशी सकाळी 7.01 वाजता त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये लोकांना मोफत प्रवेशाची माहिती देण्यात आली आणि जनतेला विजय परेडमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले. यानंतर, आरसीबीने आणखी दोन पोस्ट पोस्ट केल्या.
दुसरी पोस्ट सकाळी ८ वाजता करण्यात आली, ज्यामध्ये पुन्हा एकदा ही माहिती देण्यात आली. त्यानंतर, 04 जून रोजी सकाळी 8:55 वाजता, आरसीबीने त्यांच्या अधिकृत हँडल @Rcbtweets वर आरसीबी संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहलीची व्हिडिओ क्लिप शेअर केली, ज्यामध्ये त्याने सांगितले की संघाला हा विजय 04 जून रोजी बेंगळुरूमध्ये बेंगळुरू शहरातील लोकांसह आणि आरसीबी चाहत्यांसह साजरा करायचा आहे.
मोठ्या संख्येने लोक जमले आणि…
अहवालात पुढे म्हटले आहे की 4 जून रोजी दुपारी 3 वाजता चिन्नास्वामी स्टेडियमजवळ अचानक मोठी गर्दी जमली. अहवालात असे म्हटले आहे की या मर्यादित जागेत सुमारे 3,00,000 लोक जमले होते. त्याचवेळी, स्टेडियमची क्षमता मात्र फक्त 35,000 लोकांची होती. आरसीबी आयोजकांनी त्यांच्या अधिकृत हँडलवर कार्यक्रमात सर्वांसाठी प्रवेश मोफत असेल असे पोस्ट केल्यानंतर, स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर इतकी मोठी गर्दी जमली.
गेट व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या आयोजक/आरसीबी/डीएनए/केएससीए वेळेवर अधिकचे गेट उघडण्यात अयशस्वी झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. आयोजकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे गर्दीने गेट क्रमांक 1, 3 आणि 21 तोडले आणि स्टेडियममध्ये प्रवेश केला. अहवालात म्हटले आहे की स्टेडियमच्या गेट क्रमांक 02, 2A, 6, 7, 15, 17, 18, 20 आणि 21 वर चेंगराचेंगरी झाली. यानंतर गेटवर आणि आजूबाजूला असलेल्या पोलिसांनी त्वरित प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली, असे अहवालात म्हटले आहे.
परेड का रद्द करण्यात आली नाही?
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि अचानक विजय रॅली रद्द केली तर लोकांमध्ये हिंसाचार होऊ शकला असता. म्हणूनच परेड रद्द करण्यात आली नाही.
दरम्यान, या अहवालानंतर आता आता आरसीबी आणि राज्य क्रिकेट मंडळाविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आरसीबी आणि राज्य क्रिकेटमंडळाच्या अडचणीत वाढ होणार आहे.