Download App

Baichung Bhutia ने देशासाठी गोल डागले ! पण राजकारणात सहाव्यांदा मतदारांकडून ‘रेड कार्डच’

माजी कर्णधार भुतिया याने वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • Written By: Last Updated:

Baichung Bhutia: अनेक खेळाडूंनी राजकारणात यश मिळविले आहे. तर अनेकांना यशासाठी झगडावे लागत आहे. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियालाही ( Baichung Bhutia)राजकारणात झगडावे लागत आहे. सिक्कीम विधानसभा (Sikkim Assembly) निवडणुकीत भुतिया यांनी नशिब अजमावले होते. परंतु त्यांना यंदाही पराभवाचा झटका बसला आहे. सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने पुन्हा एकदा राज्यात सत्ता आणली आहे. या पक्षाचे रिक्षल धोर्जी यांनी भुतिया यांचा 4 हजार 4346 मतांनी पराभव केला आहे. भुतिया याला दहा वर्षांत सहा वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. (bhaichung bhutia-loses sikkim poll by 4346 votes 6th-defeat in 10 years)

Ahmednagar Loksabha चा गड कोण राखणार, विखे की लंके? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज?

सिक्कीममध्ये एसकेएम सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने पुन्हा एकदा राज्यात सत्ता राखली आहे. या राज्यात भाजप, काँग्रेसचाही सुपडासाफ झाला आहे. तर एसकेएमने 32 जागांपैकी 31 जागा जिंकल्या आहेत. तर भुतियाच्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाला या निवडणुकीत फक्त एक जागा जिंकता आली आली आहे. सिक्कीम विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले असून, रविवारी मतमोजणी पार पडली आहे. भुतिया याने 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 2018 मध्ये स्वतःचा हमो सिक्कीम पक्ष स्थापन केला होता. परंतु, गेल्या वर्षी हा पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) मध्ये विलीन केला होता. सध्या तो सिक्कीममधील प्रमुखविरोधी पक्ष एसडीएफमध्ये उपाध्यक्षपदावर आहेत.


राष्ट्रवादीची पावलं पुढे पडतायत; अजितदादांची अरूणाचलच्या विजयी शिलेदारांसाठी खास पोस्ट


पराभवाची सिरीजची मालिका फोडता येईना

माजी कर्णधार भुतिया याने वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भुतियाने यापूर्वी 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर 2016 मध्ये, त्याला टीएमसीच्या वतीने सिलीगुडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. मात्र, पुन्हा एकदा त्याला पराभवाचा मोठा झटका बसला होता. दोनवेळी पराभव झाल्यानंतर त्यांने स्वतःचा पक्ष काढला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने गंगटोक आणि तुमेन-लिंगी येथून निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. यानंतर 2019 च्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

follow us