राष्ट्रवादीची पावलं पुढे पडतायत; अजितदादांची अरूणाचलच्या विजयी शिलेदारांसाठी खास पोस्ट

  • Written By: Published:
राष्ट्रवादीची पावलं पुढे पडतायत; अजितदादांची अरूणाचलच्या विजयी शिलेदारांसाठी खास पोस्ट

मुंबई : अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत. या राज्यात अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घोडदौड करताना दिसत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर विजयी उमेदवारांचे कौतुक करताना अजित पवारांनी खास ट्विट केले आहे. (Ajit Pawar Special Post On X After Victory In Arunachal Pradesh Vidhansabha Election)

लोकसभेच्या निकालानंतर देशपातळीवर मोठी भाकरी फिरणार; उच्च पदासाठी विनोद तावडे चर्चेत

अजितदादांचे ट्विट काय?

अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो.

विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या १०.०६ टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मुल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

K Annamalai : भाजपच्या चाणक्याला ‘बड्डे’ च्या दिवशीच मिळणार खासदारकीचं गिफ्ट

अरूणाचलमध्ये अजितदादांच्या कोणत्या शिलेदारांनी मैदान मारलं

अरूणाचलमध्ये पार पडलेल्या विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून 15 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यापैकी टोको तातुंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असून, दोन उमेदवार मात्र थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत. तर एक उमेदवार दोन दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे.

Maharashtra Exit Poll : सांगलीत ‘नो मशाल’ ओन्ली ‘विशाल’; मविआत काँग्रेसने केली खेळी

अजित पवारांच्या पक्षाचे थोड्या मतांनी पराभूत झालेले उमेदवार

अजित पवार यांच्या पक्षाचे थोड्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये नामसांग विधानसभा मतदार संघातून नगोंगलीन बोई अवघ्या 56 मतांनी पराभूत झाले तर,खोणसा पश्चिम विधानसभा मतदार संघातून यांग सेन माटे 804, पक्के केसांग विधानसभा मतदार संघातून टेकी हेमू हे 813 मतांनी पराभूत झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज