Download App

आसाममध्ये राहुल गांधी अडचणीत! मुख्यमंत्री हिमंता यांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना…

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील (Assam)गुवाहाटी (Guwahati)येथे पोहोचली आहे. आज मंगळवारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे दिसून आले. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स देखील तोडले. या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma)यांनी डीजीपींना राहुल गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या शेअर्सची ‘गरुडझेप’, तेजीचं नेमकं कारण काय?

राहुल गांधींना गुवाहाटी शहरात फिरण्यासाठी मज्जाव केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे समजले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करुन म्हटलंय की, हा आसामी संस्कृतीचा भाग नाही. आमचं शांतताप्रिय राज्य आहे.

असे‘नक्षलवादी डावपेच’ आपल्या संस्कृतीला पूर्णपणे परकीय आहेत. आपण आसाम पोलिसांच्या डीजीपींना काँग्रेस नेते राहुल गांधींवर जमावाला भडकावल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याचे आणि त्यांच्या हँडलवर पोस्ट केलेले फुटेज पुरावा म्हणून वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

शरद पवार-ठाकरे गटाला ‘धाकधूक’; निवडणुकीच्या तोंडावरच पक्षचिन्हांवर टांगती तलवार

राहुल गांधींचे अनियंत्रित वर्तन आणि त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, असेही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या एफआयआरबद्दल राहुल गांधी म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री जे काही करत आहेत त्याचा यात्रेचा फायदा होत आहे. आमची जाहिरात केली जात आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री आणि अमित शाह आम्हाला मदत करत आहेत.

हे घाबरवण्याचे प्रयत्न आहेत, पण आम्ही घाबरत नाही. लोक म्हणत आहेत की, जर जेपी नड्डा गुवाहाटीला जाऊ शकतात तर राहुल गांधी का जाऊ शकत नाहीत? हिमंता हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. इथे खूप बेरोजगारी आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी आसाम सरकारवर घणाघाती टीका केली.

follow us