Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या शेअर्सची ‘गरुडझेप’, तेजीचं नेमकं कारण काय?

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या शेअर्सची ‘गरुडझेप’, तेजीचं नेमकं कारण काय?

Budget 2024 : शेअर बाजारात गव्हर्नमेंट सेक्टरमधील (Government Sector)कंपन्या चांगलीच घोडदौड करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भारतीय रेल्वेशी (Indian Railways)संबंधित अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. IRCTC शेअर्स पासून IRFC पर्यंतच्या शेअर्सने गरुडझेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेशी संबंधीत शेअर्समध्ये अवघ्या एका महिन्यात, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडच्या शेअर्सने 93 टक्के आणि रेल विकास निगम (RVNL) च्या शेअर्सने 87 टक्क्यांनी उसळी घेतल्याचे दिसून आले. असं असलं तरी आज मात्र रेल्वेच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली आहे.

अयोध्येतून परत येताच PM मोदींचा मोठा निर्णय : एक कोटी घरांमध्ये होणार वीजनिर्मिती

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी (Budget 2024)सादर होण्यापूर्वी रेल्वेशी संबंधीत शेअर्समध्ये झालेल्या ताबडतोड वाढीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. या अर्थसंकल्पात (Budget expectations)विशेष काय असणार आहे? की ज्यामुळे रेल्वेच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ सुरु आहे. देशात रेल्वेचे झपाट्याने आधुनिकीकरण सुरु आहे.

शिर्डी लोकसभेसाठी चुरस वाढली… महाविकास आघाडीकडून आणखी एका पक्षाची दावेदारी

देशात जास्तीत जास्त वंदे भारत रेल्वे सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रेल्वेचा खर्च वाढत आहे. त्यामुळे आता आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेच्या बजेटमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यात IRCON चा शेअर आज (दि.23) ट्रेडिंग सत्रात 231.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. हाच शेअर विशेष ट्रेडिंग सत्रामध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 261.35 रुपयांवर पोहचला होता. पण तो जानेवारी महिन्यात या कंपनीचा शेअर 45 टक्क्यांनी वाढला.

या शेअरने यंदा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. असं असलं तरी आज रेल्वेच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज