अयोध्येतून परत येताच PM मोदींचा मोठा निर्णय : एक कोटी घरांमध्ये होणार वीजनिर्मिती
नवी दिल्ली : अयोध्येतील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिराचा (Shree Ram Mandir) उद्घाटन आणि ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा संपन्न उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. त्यानंतर राजधानी दिल्लीत परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला. सौरऊर्जेद्वारे वीज निर्मितीसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्यदय योजना’ सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. (Prime Minister Narendra Modi has launched ‘Pradhan Mantri Suryadaya Yojana’ to generate electricity through solar energy.)
जगातील तमाम भक्तांना सूर्यवंशी प्रभूश्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.” असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरुन याबाबतची घोषणा केली. यावेळी या योजनेबाबतअ धिकाऱ्यांसोबत चर्चा करतानाचे काही फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत.
सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि… pic.twitter.com/GAzFYP1bjV
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
“अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळे केवळ गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही तर ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल,” असाही आशावाद पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
‘कोण नरेंद्र मोदी, कोण फडणवीस, कोण शिंदे? आजचा ‘रावण’ अजिंक्य नाही’; राऊतांचा महायुतीवर घणाघात
अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला.