Download App

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात नवा ट्विस्ट; कुरिअर बॉयने ईडीवरच केले आरोप

  • Written By: Last Updated:

Mahadev Betting App : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर महादेव बेटिंग अ‍ॅप (Mahadev Betting App) प्रकरणात 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप ईडीने केला होता होता. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या कुरिअर बॉयने ईडीवरच आरोप केले आहेत. आपण कधीही कोणत्याही राजकारण्याला रोख रक्कम दिली नाही. ईडीचे अधिकारी फसवत आहेत, असे सांगितले.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीने छत्तीसगड छापे टाकून असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तो हे पैसे बघेल नावाच्या राजकारण्याला देणार होते, असा आरोप ईडीने केला होता. महादेव बेटिंग अॅपवरून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बेकायदेशीरपणे 508 कोटी रुपये घेतल्याचे ईडीने सांगितले होते.

Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर 508 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप करणारा कुरियर असीम दास म्हणाला की, त्याने कधीही कोणत्याही राजकारण्याला रोख रक्कम दिली नाही. त्याला फक्त फसवले गेले आहे. ईडीने असीम दासला अटक केली आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या चार दिवस आधी 3 नोव्हेंबरला दास यांना 5 कोटींहून अधिक रोख रकमेसह अटक करण्यात आली होती.

शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी लागू नये; ओबीसी आरक्षणावरुन आंबेडकरांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर असीम दासने धक्कादायक विधान करून सर्वांनाच चकित केले आहे. असीम दासने भूपेश बघेल यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तुरुंगातून ईडीच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात, असीम दास म्हणाला की, त्याला फसवले जात आहे आणि अधिकाऱ्यांनी त्याला इंग्रजी भाषेतील जबाबावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले आहे. त्याला इंग्रजी भाषा समजत नाही, असे त्याने सांगितले.

Jitendra Awhad on Sunil Tatkare : साहेबांना संपवण्याची जी सुपारी घेतली ती वाजवत बसा... | LetsUpp

Tags

follow us