Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत केवळ ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही असं म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे की, सहमतीने नातेसंबंधात राहणाऱ्या जोडप्यांमध्ये ब्रेकअप झाल्यामुळे एखाद्या पुरुषाविरुद्ध फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही.
2019 मध्ये तक्रारदार महिलेने आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकणात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीव्ही नागरथना (Justice BV Nagaratna) आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह (Justice N Koteshwar Singh) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती.
या प्रकरणात बार आणि खंडपीठाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ब्रेकअपमुळे सहमतीने नातेसंबंधात राहणाऱ्या जोडप्यांमध्ये फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही. जर पुरूष लग्न करत नाही त्यामुळे सहमतीने निर्माण झालेल्या संबंधांना गुन्हेगारी रंग दिला जाऊ शकत नाही. असं या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सांगितले असल्याची माहिती दिली आहे.
Mere breakup of relationship cannot lead to rape case against man: Supreme Court
report by @tiwari_ji_ https://t.co/6C1jTnXOI4
— Bar and Bench (@barandbench) November 21, 2024
नेमकं प्रकरण काय?
महिलेने 2019 मध्ये लग्नाच्या बहाण्याने तिचा लैंगिक छळ केल्याची एफआयआर आरोपीविरोधात दाखल केली होती. महिलेने फिर्यादीत म्हटले होते की, आरोपीने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची आणि तसे न केल्यास नुकसान होईल अशी धमकी दिली होती. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अदानींवरील लाचखोरीच्या आरोपांनंतर शेअर बाजारात हाहाकार; शेअर कोसळले, 2 लाख कोटी पाण्यात
यावेळी न्यायालयाने म्हटले आहे की, फिर्यादीचे म्हणणे मान्य केले तरी, आरोपीने केवळ लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले होते, असा निष्कर्ष काढता येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने खटला रद्द केला.