Download App

PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, महिलेने मारली ताफ्यासमोरच उडी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • Written By: Last Updated:

रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Security Breach) सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी बिरसा मेमोरियल पार्कमध्ये जात होते. त्यावेळी रेडियम रोडवर अचानक एक महिला पंतप्रधानांच्या गाडीसमोर आली. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा जवानांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पीएम मोदींची गाडी काही वेळ तिथे थांबली. त्यानंतर काही सेकंदातच घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिलेला तेथून बाजूला केले.

Bank Alert : तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद! 31 डिसेंबरपूर्वी करा ‘हे’ काम… 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या रांचीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान हे आज सकाळी राजभवनातून निघून जेल चौकातील बिरसा मुंडा मेमोरियल पार्कमध्ये जात होते. दरम्यान, रेडियम रोडवर सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या. एक महिला अचानक ताफ्यात घुसली होती. त्यामुळं सुरक्षारक्षकांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला होती. मात्र, प्रसंगावधान दाखवत चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावावा लागला. त्यामुळं पुढचा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेमुळं पु्न्हा एकदा पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कमतरता दिसून आली.

पीएम मोदींचा ताफा थांबल्यामुळे एनएसजी आणि इतर सुरक्षा रक्षकांना तात्काळ सतर्क झाले होते. सुरक्षा दल आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने महिलेला रस्त्याच्या कडेला नेले. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा पुढे निघाला.

शतकांचा ‘विराट’ बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तिच्या काही समस्या पंतप्रधान मोदींसमोर मांडायच्या होत्या. त्यामुळं सदरीला महिला पंतप्रधानांचा ताफा येण्याची वाट पाहत होती. तिला ताफा दिसताच मोदींच्या कारपुढे महिलेनं उडी मारली. दरम्यान, पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकत असताना पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये अशा पद्धतीने कुचराई झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

आत्तापर्यंत पंतप्रधानांच्या सुरक्षेत अनेक चुका
पीएम मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याची पहिलीच घटना नाही. याआधी त्यांच्या सुरक्षेता चुका झाल्या होत्या. 30 एप्रिल रोजी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये रोड शोदरम्यान पीएम मोदींवर मोबाईल फेकण्यात आला होता. तर त्याआधी 19 जानेवारी रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या व्हीव्हीआयपी परिसरात 38 वर्षीय व्यक्तीने प्रवेश केला होता. 5 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटांसाठी फ्लायओव्हरवर थांबला होता. कारण, शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता. तर अलीकडेच 23 सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. त्यांच्या ताफ्यासमोर एका तरुणाने उडी मारली. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यापासून अवघ्या 10 फूट अंतरावर होता.

follow us