Bank Alert : तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद! 31 डिसेंबरपूर्वी करा ‘हे’ काम…

Bank Alert : तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद! 31 डिसेंबरपूर्वी करा ‘हे’ काम…

NPCI New Guidelines : काही वर्षांत देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payments)ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. UPI गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं डिजिटल पेमेंट मोड ठरलं आहे. त्यातच आता तुमच्या UPI आयडीबाबत (UPI ID)एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व बँका, PhonePe आणि Google Pay सारख्या थर्ड पार्टी अॅप्स निष्क्रिय UPI आयडी बंद करणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सला एका वर्षापासून कोणतेही व्यवहार न केलेले आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश दिलेत. यासाठी एनपीसीआयने 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

Third Party Song : सनी लिओनी थिरकणार ‘थर्ड पार्टी’मध्ये, चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत, 31 डिसेंबरच्या आधी तुमचा UPI आयडी सक्रिय करावा लागणार आहे. अन्यथा तुमचा UPI आयडी निष्क्रिय होईल. UPI आयडी निष्क्रिय करण्याच्या आधी बँक वापरकर्त्यांना ईमेल किंवा मेसेजद्वारे सूचना देखील पाठवली जाणार आहे. NPCI च्या या पावलामुळे UPI व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार असून चुकीचे व्यवहार देखील थांबण्यास मदत होणार आहे.

शतकांचा ‘विराट’ बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे

NPCI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व थर्ड पार्टी अॅप्स आणि PSP बँका निष्क्रिय ग्राहकांचा UPI आयडी आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबरची पडताळणी करतील. एका वर्षापासून या आयडीवरून कोणत्याही प्रकारचे क्रेडिट किंवा डेबिट केले नसल्यास ते बंद केले जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीवरून व्यवहार करता येणार नाहीत, हे देखील वापरकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

NPCI ने अशा UPI आयडी शोधण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सला 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. NPCI च्या
या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत किंवा त्याचा गैरवापर होणार नाही अशी अपेक्षा आहे. अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यावर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

बऱ्याचदा लोक आपला मोबाईल नंबर बदलतात आणि त्याच्याशी संबंधित UPI आयडी निष्क्रिय करायला विसरतात. अनेक दिवस तो नंबर बंद असल्याने तो दुसऱ्या कोणाला तरी मिळतो. मात्र या नंबरशी जुना UPI आयडी जोडलेला तसाच असतो. अशा परिस्थितीत चुकीचे व्यवहार होण्याची दाट शक्यता असते. त्याच पार्श्वभूमीवर NPCI ने हे पाऊल उचललं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube