Third Party Song : सनी लिओनी थिरकणार ‘थर्ड पार्टी’मध्ये, चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

  • Written By: Published:
Third Party Song : सनी लिओनी थिरकणार ‘थर्ड पार्टी’मध्ये, चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

Third Party Song : सनी लिओनी (Sunny Leone) या अभिनेत्रीने पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरूवात केली. त्यानंतर आता तिने बॉलिवूडमध्येही आपला जम बसवला. सनीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान तयार केलं. सनी ही सनसिटी मीडिया आणि एंटरटेनंमेटं नावाच्या प्रोडक्शन हाऊसची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वीच सनीचा केनेडी हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर आता सनीच्या पुढच्या प्रोजेक्टविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, सनीचं नव गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतं.

शतकांचा ‘विराट’ बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे 

सनी लवकरच तिच्या नवीन पार्टी साँगमध्ये दिसणार असून ‘थर्ड पार्टी’ अस या गाण्याचं नाव आहे. या गाण्याची निर्मिती टी सीरीजने केली आहे. नुकतचं या गाण्याचे पोस्टर टी सीरीजने इंन्साग्रामवर शेअर केला आहे. त्याला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या. टी सिरीजने लिहिलं की, १५ नोव्हेंबरला गाणं रिलीज होणार आहे. रात्रीच्या लयीत नाचण्यासाठी सज्ज व्हा, असं कॅप्शन लिहिलं. या गाण्याच्या पोस्टवर सनी वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

खुशखबर! इंटरनेटशिवायही मोबाईलवर पाहता येणार चित्रपट, काय आहे D2M नेटवर्किंग? 

यूपीचे प्रसिद्ध आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आता ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला आहे. अभिषेक सिंग यांचा अभिनय आणि गायनाकडे मोठा कल आहे. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर अभिषेक सिंग आता बॉलिवूडमध्ये आपलं करिअर घडवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानंतर आता त्याचं सनी लिओनीसोबतचं थर्ड पार्टी हे गाणं रिलीज होणार आहे. थर्ड या पार्टी गाण्याचे अभिषेक सिंग यांनीच गायन केलं. तर आदिल शेख याने कोरिओग्राफी केलेली आहे. हे गाणं सनीच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेलं, असं बोलल्या जातं आहे.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सनी लिओनी यांचा तामिळ चित्रपट कोटेशन गँगही रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कोटेशन गँग’ चे दिग्दर्शन विवेक कुमार कन्नन यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळमध्येही रिलीज होणार आहे. सनीचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube