सलग सात वेळा दरवाढीनंतर अखेर दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट

व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात कपात, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 183.50 रुपयांची घट करण्यात आली.

Untitled Design 62

Untitled Design 62

Big reduction in the price of commercial LPG cylinders : महागाईच्या झाला सहन करणाऱ्या हॉटेल, रेस्टोरंट आणि इतर व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 183.50 रुपयांची घट करण्यात आली असून, 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरात देखील 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 1 जुलैपासून लागू झाले आहेत.

नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3,113.50 रुपयांवरून 2,930 रुपयांवर आली आहे. तर 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 821.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे. सलग अनेक महिन्यांच्या द्रविधिनानंतर पहिल्यांदाच झालेली ही लक्षणीय कपात असल्याने व्यावसायिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. विशेषतः इराण-अमेरिका संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटामुळे एलपीजी पुरवठ्यावर दबाव वाढला होता. काही भागांत व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा मर्यादित करण्यात आल्याने काळ्या बाजारात सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे हॉटेल, खानावळी, कॅटरिंग व्यवसाय तसेच छोट्या-मोठ्या उद्योगांवरील खर्चात मोठी वाढ झाली होती.

बालकांना गुन्ह्यांसाठी प्रवृत्त करणाऱ्यांना मकोकाचा फास; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

जानेवारी महिन्यापासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल सात वेळा वाढ करण्यात आली होती. 1 जानेवारीला 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,580 रुपये होती. मात्र त्यानंतर प्रत्येक महिन्यात दरवाढ होत गेली आणि हुनाखेर ही किंमत 3,113.50 रुपयांपर्यंत पोहोचली. जानेवारीत 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये दोन टप्प्यांत मिळून 142.50 रुपये, एप्रिलमध्ये 195.50 रुपये, मे महिन्यात तब्बल 993 रुपये आणि जूनमध्ये 42 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत सिलेंडरच्या दर्रात दीड हजार रुपयांहून अधिक वाढ झाली होती.

याचप्रमाणे 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या किंमतीत देखील सातत्याने वाढ होत होती. हा सिलेंडर अनेक छोटे व्यावसायिक तसेच काही घरगुती ग्राहकांकडून वापरला जातो. त्यामुळे या सिलेंडरच्या दरात झालेली 13 रुपयांची कपात देखील महत्वाची मनाली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकराने इंधन क्षेत्रात आणखी एक महत्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवले आहेत. 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वी व्यावसायिक वापरासाठी रिटेल पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. विशेषतः डिझेलची विक्री प्रति ग्राहक 200 लिटरपर्यंत मर्यादित करण्यात आली होती.

यंदाचा जून ठरला गेल्या 126 वर्षांतील सर्वात कोरडा महिना, सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पावसाची नोंद

12 जून रोजी लागू करण्यात आलेले हे निर्बंध ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी आणि किरकोळ विक्रीसाठी असलेले इंधन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापराकडे वळवले जाणार नाही, यासाठी लादण्यात आले होते. मात्र पुरवठ्याची परिस्थिती सुधारू लागल्याने केंद्र सरकारने हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातील कपात आणि पेट्रोल-डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयामुळे हॉटेल व्यावसाय, वाहतूक क्षेत्र, लघुउद्योग आणि इतर व्यावसायिक घटकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर इंधन आणि एलपीजीच्या किंमतींची दिशा अवलंबून राहणार आहे.

Exit mobile version