Download App

राजकारणात नितीश कुमारांचंच वजन, पण संपत्तीत ‘तेजस्वी’च किंग; दोन्ही नेत्यांच्या संपत्ती जाहीर

Nitish Kumar Assets : बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचंच वजन अधिक असल्याचं पाहायला मिळालंय, मात्र, संपत्तीच्या बाबतीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवच (Tejaswi Yadav) किंग असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, 2023 च्या अखेरीस बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांनी आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली आहे. बिहार सरकारच्या वेबसाईटवर ही माहिती सार्वजनिक करण्यात आली असून यामध्ये नितिश कुमारांची संपत्ती 1.64 कोटी असल्याचं समोर आलं तर दुसरीकडे कुमार यांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची संपत्ती तीन पटीने अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रोज स्वप्न पडतात अन् सकाळ उठून…’ संदिपान भुमरेंचा टोला

नितीश कुमार यांच्याकडे 11.32 लाख रुपयांची फोर्ड इकोस्पोर्ट कार, 1.28 लाख रुपयांच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची अंगठी आणि अन्य संपत्ती, ज्यामध्ये 1.45 लाख रुपयांच्या 13 गाई, 10 वासरे, व्यायामासाठी एक सायकल, माइक्रोवेव ओवन यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत द्वारका येथे एक अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत 2004 मध्ये 13.78 लाख रुपये होती. आता ही किंमत 1.48 कोटी झाली आहे. मागील वर्षी नितीश कुमार यांच्याकडे एकूण संपत्ती 75.53 लाख इतकी होती.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटींची संपत्ती आहे.

Japan : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंप, रस्त्यांवर भेगा अन् भयभीत नागरिक; पाहा फोटो

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव यांनी आर्थिक वर्ष 2022-23 काळात एकूण उत्पन्न 4.74 लाख घोषित केले आहे. त्यांच्याकडे 5 हजार रुपये रोकड आहे. तर पत्नी राजश्री यांच्याकडे 1 लाख रोकड आहे. त्यांचे मोठे भाऊ तेजप्रताप जे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्याकडे एकूण 3.58 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

“जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण” : श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ठाकरे-राऊतांना फटकारले

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू तेज प्रताप यादव यांची एकत्रित एकूण मालमत्ता सुमारे 7.68 कोटी रुपये असून जी नितीश कुमार यांनी घोषित केलेल्या पेक्षा सहा पट अधिक आहे. तेजस्वी यादव यांची जंगम मालमत्ता 1.11 कोटी रुपये आहे, तर त्यांची स्थावर मालमत्ता 3 कोटी रुपये आहे. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे एकूण उत्पन्न 4,74,370 रुपये आणि रोख 50,000 रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव यांच्याकडे एक लाख रुपये रोख आहेत, तर मंत्री तेज प्रताप यादव यांनी 1.79 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.78 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांनी 98,572 रुपयांची रोकड घोषित केली आहे आणि अनेक बँकांमध्ये सुमारे 17 लाख रुपये जमा केले आहेत. त्यांच्याकडे 29 लाख रुपये किमतीची मोटरसायकल आणि 22 लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू आहे.

follow us