Download App

नितीश कुमारांचं ठरलं! RJD ला धक्का देत ‘या’ दिवशी JDU-BJP सरकारचा शपथविधी ?

Bihar Politics : सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार यांनी भाजपाला झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर सगळी तयारी झाली असून येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. जर हे राजकारण प्रत्यक्षात आलं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरेल.

बिहार सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी आधी काडी टाकली; लालूंच्या मुलीने आगीत तेल ओतले

बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे अशा सूचक शब्दांत भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

रोहिणी आचार्य यांचे तीन ट्वीट
रोहिणी आचार्य यांनी सलग तीन ट्वीट नितीशकुमार यांच्याबाबत केले. स्वतःच्या नियमीमध्ये खोट असेल तर विधीचे विधान कोण टाळेल, समाजवादी असल्याचे काही जण दावा करतात. परंतु हवे प्रमाणे विचारधारा बदलतात. काही लोक आपल्यामधील कमतरता पाहत नाहीत. दुसऱ्यावर चिखलफेक करतात, असे ट्वीट करतात. त्यावरून बिहारचे राजकारण पेटले आहे.

Bihar Politics : JDUचे सर्वेसर्वा नितीश कुमारच; लल्लन सिंह यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेसच्या सूत्रांनी इंडिय टुडेशी बोलताना सांगितले की बिहारमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांच्याबद्दल शंका उपस्थित करून नितीश कुमार यांना भाजपाकडे परतणे सोपे जाणार नाही असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. विधानसभेचे अध्यक्ष राजदच्या बाजूने आहेत त्यामुळे नितीश कुमारांना अवघड जाईल असेही सांगण्यात आले.

follow us

वेब स्टोरीज