Download App

विरोधकांच्या एकजुटीच्या नादात खुर्चीवरच गदा? आप-काँग्रेसच्या सापळ्यात अडकले नितीश कुमार

Bihar Politics : राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करण्याचा नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांचा प्लॅन फेल होताना दिसत आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या आरजेडीने नव्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या एकतेच्या नावाखाली नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणातून बेदखल करण्याचे आरजेडीचे मनसूबे पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पक्षाने नवीन समीकरणे तयार करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

आरजेडीतील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी महागठबंधनात सहभागी होण्यासाठी एक अट ठेवली होती. ती म्हणजे तेच मुख्यमंत्रीपदी राहतील. आरजेडीने त्यांची अट मान्य केली होती. पण त्याचवेळी आरजेडीनेही एक अट ठेवली होती. त्यानुसार 2024 च्या निवडणुकांच्या अनुषंगाने नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतील. यासाठी देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करतील. महागंठबधनच्या बाजूने नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनविण्यासही आरजेडीनेच ग्रीन सिग्नल दिला होता.

Sachin Pilot : वडिलांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट घेणार आक्रमक भूमिका? समोर आली मोठी माहिती

या अभियानाची सुरुवात नितीश कुमार यांनी केली. मात्र, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यावेळी राहुल गांधी भारत जोडो यात्रेची तयारी करत होते. नंतर मात्र त्यांना शिक्षा होऊन त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी निवडणूक लढण्याची शक्यता राहिली नाही त्यामुळे नितीश कुमार पुन्हा सक्रिय झाले. यावेळी मात्र त्यांनी नवा फॉर्म्युला शोधून काढला. त्यांनी स्वतःच सांगितले की ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीत. यानंतर काँग्रेसनेही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनाच विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, नितीश कुमार यांना त्यात यश आले नाही.

काँग्रेसने दिला जोरदार झटका 

नितीश कुमार यांनी विरोधी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र याचवेळी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. ममता यांनी काँग्रेसच्या आमदाराला तृणमूल काँग्रेसमध्ये घेतले. आम आदमी पार्टीचे महासचिव संदीप पाठक यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत आप कोणताही पक्ष किंवा आघाडीबरोबर तडजोड करणार नाही. काँग्रेसलाही काहीतरी वेगळे राजकारण शिजतंय याचा सुगावा लागला. 12 जूनला होणाऱ्या बैठकीसाठी संमती तर दिली पण ऐनवेळी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. यामुळे नितीश कुमार यांना मोठा झटका बसला. असे राजकारण सुरू असतानाच आरजेडीनेही वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात केली.

43 आमदारांचा पक्ष किती दिवस सांभाळायचा ?

फक्त 43 आमदार असलेल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री कसा राहू शकतो असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेही आता नितीश कुमार यांचा जनाधार संपल्यातच जमा आहे. त्यांचे जवळचे नेतेच त्यांना सोडून चालले आहेत. नितीश कुमार यांचा जेडीयू 43 आमदारांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जरी त्यांच्या पक्षाला 16 जागा मिळाल्या असल्या तरी या निवडणुकीत त्यांना भाजपाचा पाठिंबा होता. 2014 च्या निवडणुका विचारात घेतल्या तर जेडीयूला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच पक्षाची ताकद फक्त दोन जागांचीच आहे.

Polluted Cities In India : प्रदुषित शहरांच्या यादीत भिवंडी शहर तिसऱ्या क्रमांकावर…

जर अशी परिस्थिती असेल तर आरजेडी अजूनही नितीश कुमार यांचे सहकार्य का घेत आहे. आरजेडीला या गोष्टीचा अंदाज नव्हता की नितीश कुमार यांची अशी अवस्था होईल. पक्षाच्या नेत्यांना तर असे वाटत होते की ते पंतप्रधान होतील आणि बिहारच्या राजकारणातून आपोआप बाहेर पडतील. याच कारणामुळे नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे सातत्याने सांगण्यात येत होते. पण आरजेडीचा सगळा अंदाजच चुकला.

आता वादावादी ठरलेलीलच 

आता अशी माहिती मिळत आहे की लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना नितीश कुमार यांच्या पक्षाला जागा देताना 2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या जागा आणि 2020 मधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागा विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल. असे घडले तर वाद होणार आहेत. नितीश कुमार यांना महागठबंधनातून बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

Tags

follow us