India replies Donald Trump on Tariff : भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ (India Tariff) लावण्याची घोषणा केली होती तर आता त्यांनी भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असून नंतपर हेच तेल जागतिक बाजारात चांगल्या नफ्यासह विकतो या कारणामुळे भारतावर वाढीव टॅरिफ लावल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावर आता भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिले आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दु्र्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक आहे असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत ट्विट केले आहे.
इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मोठी बातमी, भारतावर 50 टक्के टॅरिफ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ (India Tariff) लावण्याची घोषणा केली होती तर आता त्यांनी भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारीच सांगितले होते की मी पुढील 24 तासांत भारतावरील टॅरिफ वाढवणार आहे.
ट्रम्पची इच्छा आहे की भारताने रशियाकडून (Russia) तेल खरेदी करू नये. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी तणाव दिसून येत आहे. यापूर्वी देखील अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करण्याचा आरोप करत 24 तासांच्या आता भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर आता ट्रम्प यांनी भारतावर 25 अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला आहे.
मला तुमच्याशी बोलायची गरज नाही, मी मोदी अन् जिनपिंगशी बोलेण, ब्राझीलचे अध्यक्ष का भडकले?
भारतावर आकारलेल्या या टॅरिफमुळे भारताला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहेच. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या खेळीला आता भारत सरकार कोणत्या पद्धतीने उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण दोन्ही देशांतील व्यापार काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. त्यामुळे भारत व्यापाराच्या माध्यमातून उत्तर देणार की आणखी कोणती रणनीती वापरणार याचं उत्तर लवकरच मिळेल.