Download App

बिहार हादरलं! नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या विद्यार्थ्यावर झाडली गोळी…

बिहारच्या सुपौल जिल्ह्यात एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या विद्यार्थ्यावर गोळी झाडल्याची घटना घडलीयं. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Bihar News : बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून मोठी समोर आलीयं. एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गोळीबार (Bihar Gun Fire) केल्याची घटना घडलीयं. या गोळीबारात विद्यार्थ्याच्या हाताला गोळी लागली असून गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडालीयं.

विधानसभेच्या तोंडावर महायुतीचं ‘उद्योग’ धोरण; मराठवाड्यात ‘Toyota’ कंपनी करणार मोठी गुंतवणूक

नेमकं प्रकरण काय?
बिहारच्या सुपौली जिल्ह्यातील सेंट जॉन बोर्डिंग स्कूलमधील नर्सरीमध्ये शिकणारा पाच वर्षीय विद्यार्थी त्याच्या बॅगेत बंदूक घेऊन आला होता. शाळा भरण्याला काही अवधी बाकी होता. थोड्याच वेळात शाळेत प्रार्थना सुरु होणार होती. याचदरम्यान, नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरी इयत्तेतील आसिफ नामक विद्यार्थ्यावर गोळी झाडली. बंदुकीतून निघालेली गोळी आसिफच्या डाव्या हाताला लागली. हाताला गोळी लागल्याने आसिफ गंभीर जखमी झाला.

Game Changer: वाढदिवशी कियारा अडवाणीचं चाहत्यांना मोठं गिफ्ट! आगामी ‘गेम चेंजर’ सिनेमातील पोस्टर प्रदर्शित

या घटनेनंतर आसिफला तत्काळा त्रिवेणीगंजमधील अनुमंडलीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयात आसिफवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आलीयं. या घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरु केला असून शाळेत अशी घटना नेमकं कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आसिफच्या कुटुंबियांकडून लालपट्टी गावात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्या आली. तब्बल अर्ध्या तासांपासून कुटुंबियांकडून गावात आंदोलन सुरु होते, अखेर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन थांबवलं. शाळेत अशी घटना घडल्यानंतर पोलिसांकडून ठोस पाऊले उचलण्यात येत आहेत. सेंट जॉन बोर्डिंग स्कूलमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

follow us